
Sonali Kulkarni : 'भारताल्या बऱ्याचशा मुली आळशी, म्हणून त्यांना नवरा हा..' सोनालीनं टोचले कान!
Sonali Kulkarni marathi actress share indian women : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. आपण जे बोलू त्यावर ठाम राहून अरे रे का रे करत सडेतोडपणे भूमिका मांडणं ही तिची ओळख आहे. अशातच तिच्या एका मुलाखतीतील वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे सोनाली चर्चेत आली आहे.
मराठी, हिंदी चित्रपट विश्वामध्ये दोन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सोनालीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.काही दिवसांपूर्वी तिचा ओटीटीवर धारावी बँक नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. त्यामध्ये तिनं साकारलेली एका राजकारणी महिलेची भूमिका प्रेक्षकांना भावली. तिचं चाहत्यांनी कौतूक केलं होतं. आता सोनाली वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.
Also Read - ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये सोनालीनं स्त्री पुरुष समानता, लग्नाळु मुलींचे प्रश्न, त्यांच्या अवास्तव अपेक्षा त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न यावर बोट ठेवले आहे.तिनं परखडपणे व्यक्त केलेल्या विचारांवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या भूमिकेचं कौतूक केलं आहे. सोनाली म्हणते, आजकाल बऱ्याचशा मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा फारच वेगळ्या आहेत.
मुलींना आपला होणारा पती फार पैसेवाला हवा आहे. त्याला चांगला जॉब हवा आहे. त्याचे स्वताचे घर हवे आहे, त्याच्याकडे सगळ्या सोयीसुविधा हव्या आहेत. मात्र ते एकत्रितपणे काम करण्यास नकार देतात. वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा वाढताना दिसत आहेत. कित्येक कुटूबांनी मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. याचा अर्थ हाच की त्यांनी त्यांच्या जबाबदारीनं जगावं.
भारतातल्या बऱ्याचशा मुली या आळशी आहेत. त्यामुळेच की काय त्यांच्या बहुतांशी अपेक्षा या सगळ्या नवऱ्याकडून आहेत. त्याचे स्वताचे घर, चांगला जॉब, मोठा पगार, दरवर्षी त्याच्या पगारात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या त्यांच्या अपेक्षा आहेत, मात्र यासगळ्याचा नात्यावर काय परिणाम होतो हे कुणी सांगायला तयार नाही. त्यावर विचारही होत नाही. त्यांना आपण संसारासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे हे लक्षात का येत नाही. असा प्रश्न सोनालीनं यावेळी उपस्थित केला.
मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, येत्या काळात तुम्ही अधिक स्वावलंबी व्हावं. तुमच्या पार्टनर सोबत खर्च देखील शेयर करावा. केवळ कुणावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. असं मत सोनालीनं यावेळी व्यक्त केले आहे. तिच्या या भूमिकेचे कौतूक होत आहे तर काहींनी त्यावर प्रतिकूल प्रतिक्रियाही दिल्या आहेत.