सोनम-स्वरा  पुन्हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

‘वीरे दी वेडिंग’ यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा सोनम आणि स्वरा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

‘रांझणा’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून सोनम के अहुजा म्हणजेच (सोनम कपूर) आणि स्वरा भास्कर यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या आहेत. त्यांचा ‘वीरे दी वेडिंग’ यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा सोनम आणि स्वरा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

sonam and swara movies

पण या वेळी सोनम पडद्यावर नाही; तर पडद्यामागे असणार आहे. सोनमने आपल्या पहिल्या दिग्दर्शनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोनमला स्वराचा अभिनय खूपच आवडतो. त्यामुळे तिने आपल्या पहिल्या चित्रपटात स्वरालाच घ्यायचे निश्‍चित करून टाकले आहे. आता जर सगळे व्यवस्थित पार पडले तर पुन्हा एकदा आपल्याला सोनम-स्वराचा एकत्रित चित्रपट पाहता येणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonam and swara again together