पुरुष कलाकारांना 'हिरो' बनवायचं तर आम्हाला 'चेटकीण'

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 15 November 2020

सोनमने बॉलीवूडमधल्या पुरुषीपणावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषय़ी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी सोनमने बॉलीवूडमध्ये पुरुष अभिनेत्यांना आणि महिला अभिनेत्रींना मिळणारी वागणूक याकडे लक्ष वेधले आहे.

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री सोनम कपूर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर शेयर करत असलेल्या पोस्टमुळे ती अनेकदा नेटक-यांच्या टीकेलाही सामोरी गेली आहे. मात्र आपण व्यक्त केलेल्या मतांवर ठाम असणा-यांपैकी एक अभिनेत्री म्हणून तिचे नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री हा वाद काही नवा नाही. त्यांचे मानधन, त्यांना चित्रपटात मिळणारं स्थान, प्रसिध्दी य़ावरुन प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. 

सोनमने बॉलीवूडमधल्या पुरुषीपणावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषय़ी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी सोनमने बॉलीवूडमध्ये पुरुष अभिनेत्यांना आणि महिला अभिनेत्रींना मिळणारी वागणूक याकडे लक्ष वेधले आहे. खरं तर यापूर्वी देखील काही कलाकारांनी यावर रोखठोक मत व्यक्त केलं होतं. सोनम म्हणाली, दिग्दर्शक पुरुष अभिनेत्यांना हिरो बनवितात तर महिला कलाकारांना चेटकीण. या शब्दांत कंगणाने निशाणा साधला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

 

चित्रपट आणि फॅशनच्या क्षेत्रात तर महिलांना फार गृहित धरलं जातं. त्यांना कलाकार म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही. तसेच त्यांच्या कॅरेक्टरवर प्रश्न उभा केला जातो.अनेकदा महिला कलाकारांचे चित्रण हे एका ‘conniving witches’  च्या स्वरुपात केले जाते. आणि हे सगळ जाणीवपूर्वक केलं जातं. असे सोनमचे मत आहे. बॉलीवूडमध्ये महिला कलाकारांच्या होत असलेल्या बदनामीमुळे सोनम अस्वस्थ झाली आहे.

हे ही वाचा: इरा खानने आई-वडिलांसह किरण रावकडे केला होता नैराश्याबाबत खुलासा, असा मिळाला सल्ला..

तिनं यापूर्वी या परिस्थितीविषयी भाष्य केलं होतं. बॉलीवूडमध्ये असणारे पुरुष कलाकार याबाबत काही बोलायला मागत नसल्याचा आपला अनुभव असल्याचे तिने म्हटले आहे. मला विनाकारण कुठलीही तक्रार करायची नाही. मात्र जे चुकीचे होत आहे त्यावर बोलायला हवी अशी माझी भूमिका आहे. मी माझी लक्ष्मणरेषा ओलांडलेली नाही. पण माझ्या इतर कलाकारांबरोबर जे काही झाले आहे त्याची मला कल्पना आहे.

रितेश देशमुखने आईच्या जुन्या साडीपासून बनवले खास दिवाळीसाठी कपडे, व्हिडिओ व्हायरल

यासगळ्या परिस्थितीची मला कमालीची भीती वाटते. महिला कलाकार नेहमीच इतरांच्या हातातील सॉफ्ट टार्गेट असतात. ज्याप्रमाणे एखादी महिला कलाकार तिच्या सहका-यांबद्दल जितक्या जिव्हाळ्याने भूमिका मांडते तसा एखादा पुरुष कलाकार मांडताना दिसत नाही. असेही सोनम म्हणाली. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonam kapoor said Male actors directors are made into hero women are made witches