सोनमची समाजसेवा 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

सगळ्या ऍवॉर्ड फंक्‍शन्सना ती कुठले कपडे घालते, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले असते. ती जे घालते त्याची स्टाईल होते. नवनवीन फॅशनची राणी आणि बॉलीवूडची स्टाईल आयकॉन समजल्या जाणाऱ्या सोनम कपूरच्या बॅग्ज्‌, कपडे, ऍक्‍सेसरीज हे जर तुम्हाला आम्हाला विकत घेता आले तर... सोनम कपूरने गुडविल ऍम्बेसिडर म्हणून एका एनजीओच्या मदतीसाठी आपले कपडे, ऍक्‍सेसरीज, बॅग्ज्‌ हे लिलावात काढायचे ठरवले आहे. या लिलावातून आलेला पैसा हा ती गुडविल ऍम्बेसिडर असलेल्या "फाईट हंगर फाऊंडेशन'ला जाणार आहे. त्यातील काही हिस्सा हा ती प्रतिनिधित्व करत असलेल्या "कडल फाऊंडेशन'लाही जाणार आहे.

सगळ्या ऍवॉर्ड फंक्‍शन्सना ती कुठले कपडे घालते, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले असते. ती जे घालते त्याची स्टाईल होते. नवनवीन फॅशनची राणी आणि बॉलीवूडची स्टाईल आयकॉन समजल्या जाणाऱ्या सोनम कपूरच्या बॅग्ज्‌, कपडे, ऍक्‍सेसरीज हे जर तुम्हाला आम्हाला विकत घेता आले तर... सोनम कपूरने गुडविल ऍम्बेसिडर म्हणून एका एनजीओच्या मदतीसाठी आपले कपडे, ऍक्‍सेसरीज, बॅग्ज्‌ हे लिलावात काढायचे ठरवले आहे. या लिलावातून आलेला पैसा हा ती गुडविल ऍम्बेसिडर असलेल्या "फाईट हंगर फाऊंडेशन'ला जाणार आहे. त्यातील काही हिस्सा हा ती प्रतिनिधित्व करत असलेल्या "कडल फाऊंडेशन'लाही जाणार आहे. पण सोनमने तिचे सगळे कपडे आणि बॅग्ज लिलावासाठी काढल्या नाहीत, तर तिने फक्त त्यातील 12 गोष्टी निवडल्या आहेत. त्यात तिचे विंटेज गाऊन्स आणि काही डिझायनर बॅग्ज्‌ यांचा समावेश असणार आहे. 

Web Title: sonam kapoor social work