esakal | वा गं ! 'भारतात काम करायला लाज वाटते',म्हणे लंडनमध्ये 'फ्रीडम',
sakal

बोलून बातमी शोधा

actress sonam kapoor

वा गं ! 'भारतात काम करायला लाज वाटते',म्हणे लंडनमध्ये 'फ्रीडम',

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हटके अंदाज आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) ही सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं सोशल मीडियावर देशाच्या फ्रीडम (freedom) संदर्भात एक वक्तव्य केलं होत. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. आपल्या देशाचा अभिमान नसेल तर तिथे राहणे राहायला का आवडते अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया तिला ट्रोलर्सनं दिल्या आहेत. मात्र आपल्या परखड़ स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या सोनमनं हे प्रकरण फारसं सिरियस घेतलं नसल्याचेही दिसून आले आहे. मात्र तिचं ते बोलण चर्चेत आलं आहे. (sonam kapoor trolled for saying i like the freedom of london)

वास्तविक अभिनयापेक्षा आपल्या वेगळेपणासाठी सर्वांचं लक्ष वेधून घेणारे काही सेलिब्रेटी आहेत. त्यात अभिनेत्री सोनमचं (soanm kapoor) नाव घ्यावं लागेल. ती नेहमीच सोशल मीडियावर राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रातील वेगवेगळ्या घटनांवर प्रतिक्रिया देत असते. तिनं आताही आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला तोंड द्यावं लागत आहे. तिनं एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की, आपल्याला लंडनमधील फ्रीडम जास्त भावतं. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

फॅशन मॅगझीन वोगला तिनं मुलाखत दिली आहे. त्यात तिनं आपल्या लंडनविषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं सांगितलं, लंडनमधील स्वतंत्रता मला जास्त आवडते. मी माझं जेवण स्वत; बनवते. साफसफाई करते. घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी करते. सोनमच्या या गप्पा तिच्या चाहत्यांना काही आवडल्या नाहीत. आपल्या देशाच्या विरोधात अशा प्रकारे तिनं मत व्यक्त करणं त्यांना खटकले आहे. या कारणामुळे ती ट्रोल झाली आहे.

हेही वाचा: 'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा: ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक

सोनमच्या त्या वक्तव्यावर एका ट्रोलर्सनं तिला म्हटले आहे की, तुला भारतात काही गोष्टींची कमतरता जाणवली का, या देशात काम करणारे तुझ्या घरात तुला न विचारता येतात का, अशाप्रकारे तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक सोनम कपूरनं आनंद आहूजाशी लग्न केलं आहे. आणि ती त्याच्यासमवेत सध्या लंडनमध्ये राहत आहे. तिच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, ब्लाइंड चित्रपटामध्ये ती दिसणार आहे.

loading image