Hot Photoshoot Of Sonarika Bhadoria : तेलगू स्टार सोनालिका भदोरिया झाली ‘बोल्ड’; बिकिनीमध्ये दिले पोझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonarika Bhadoria

तेलगू स्टार सोनालिका भदोरिया झाली ‘बोल्ड’; बिकिनीमध्ये दिले पोझ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : ‘देवों के देव महादेव’ या टीव्ही मालिकेत देवी पार्वती आणि आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया तिच्या नव्या अंदाजाने चाहत्यांना आश्चर्यचकित करीत आहे. शोमध्ये अभिनेता मोहित रैनाने भगवान शिवाची मुख्य भूमिका साकारली होती. दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. आता सोनारिका भदौरियाचा बिकिनी लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

पौराणिक आणि ऐतिहासिक टीव्ही शोमध्ये नेहमी लेहेंगा आणि साडीमध्ये दागिन्यांनी सजलेली सोनारिका भदोरिया हिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच वेगळी दिसत आहे. ती तिच्या स्क्रीन इमेजच्या विरुद्ध दिसत आहे. सोनारिका बिकिनी परिधान करून समुद्राच्या मध्यभागी उभी आहे. सोनारिका येथे चांदणीच्या रात्री बिकिनी लूकमध्ये हॉट बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.

सोनारिका रात्री पोहण्यासाठी बाहेर निघाली आणि चंद्रप्रकाशात पोझ दिली. फोटोंमध्ये तिने ॲनिमल प्रिंटेड बिकिनी टॉप आणि निऑन यलो बिकिनी बॉटम घातली आहे. तिने फोटोला ‘स्वप्नात दिसणाऱ्या वास्तविक किंवा काल्पनिक प्रतिमांचा सिक्वेल’ असे कॅप्शन दिले आहे. ‘देवों के देव महादेव’मध्‍ये पार्वतीची भूमिका केल्यानंतर ती याच नावाने ओळखली जाते.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

तेलगू स्टार सोनालिका

सोनारिका भदोरिया ही प्रसिद्ध तेलुगू स्टार आहे. तिने ‘जादुगाडू’, ‘स्पीदुन्नोडू’, ‘एदो रख आओ रके’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. सोनारिका शेवटची २०१९ मध्‍ये ‘इश्क में मरजावां'मध्‍ये दिसली होती. जिथे तिने नेत्रा शर्माची भूमिका केली होती. सोनारिका भदौरियाच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

loading image
go to top