Baipan Bhaari Deva: 'देवी'च्या दर्शनाला 'बाई', महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडलं टायटल सॉंग लॉंच

'बाईपण भारी देवा' आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.
baipan bhaari deva team mahalaxmi mandir to launch title song
baipan bhaari deva team mahalaxmi mandir to launch title songSAKAL

Baipan Bhaari Deva News: केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला.

आता जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अलीकडेच या चित्रपटाचं टायटल सॉंग मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत लॉंच करण्यात आलं.

या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे,अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई-पियुष उपस्थित होते.

baipan bhaari deva team mahalaxmi mandir to launch title song
Ramshej Movie: नाशिकचा रामशेज किल्ला अन् मावळ्यांचा पराक्रम, नवीन ऐतिहासीक सिनेमात तगडी स्टारकास्ट

'बाईपण भारी देवा' चित्रपटातील या शीर्षक गीतावर रिलीज आधीच लोकांनी ठेका धरलेला पहायला मिळाला आहे.

सोशल मीडियावर तर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच या गाण्याच्या चालीवर रील्सद्वारे ठेका धरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे निश्चितच या गाण्याविषयीची उत्सुकता लोकांमध्ये असणार हे वेगळं सांगायला नको.

baipan bhaari deva team mahalaxmi mandir to launch title song
Prabhas Adipurush: लग्नाच्या प्रश्नावर प्रभासचा चेहरा खुलला, फॅन्सच्या प्रश्नावर थेट लग्नाचं स्थळ सांगून मोकळा झाला

जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल, अनुभवायला!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

बाईपण भारी देवा सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अश्या मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

'बाईपण भारी देवा' आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com