Sonu Nigam Controversies
Sonu Nigam Controversies Esakal

Sonu Nigam Birthday: मशिदीवरील भोंग्यापासून राधे माँ पर्यंत या वादात अडकलाय बर्थडे बॉय सोनू निगम...

आपल्या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर सोनूने आज संगीत विश्वात त्याचा ठसा उमटवला आहे.

Sonu Nigam Controversies: आपल्या सुरेल आवाजाने लोकांना वेड लावणारा सोनू निगम 30 जुलै म्हणजेच आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी फरीदाबादमध्ये झाला. सोनू निगम आज 50 वर्षांचा झाला आहे. आपल्या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर सोनूने आज संगीत विश्वात त्याचा ठसा उमटवला आहे.

सोनूला लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती. त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या चौथ्या वर्षीच स्टेज शो करायला लावले अन् आज सोनूनं जगात ओळख मिळवली आहे. त्याने हिंदीशिवाय गुजराती, कन्नड, मराठी, ओरिया, मल्याळम, बंगाली, तेलगू आणि भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

Sonu Nigam Controversies
RRKPK Day 2 Collection: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' भलतीच भारी! दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डंका

तो गेल्या काही वर्षांपासून वादाचाही भाग राहिला आहे. त्यामुळे सोनू अन् वाद याच्यांत जवळचे संबध असल्याचं बोललं जात. त्याच्या आज वरच्या जास्त चर्चेत आलेल्या वादावर नजर टाकूया...

टी-सीरीजच्या दिव्या खोसलासोबत वाद:

कोरोनाच्या काळात सोनू निगम आणि दिव्या खोसला यांच्यात बराच वाद झाला होता. दोन्हींनी अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. सोनू निगमने दिव्यांचा पती आणि टी-सीरीजचा मालक भूषण कुमार यांच्यासह अनेक आरोप केले होते. त्यावेळी सोनू निगमने बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीवरही खुप टीका केली होती. त्यावरच दिव्याने प्रतिक्रिया दिली होती अन् खुप वाद निर्माण झाला होता.

Sonu Nigam Controversies
Bigg Boss OTT 2 : एल्विश, जिया, मनिषा की कुणी दुसरंच! घरातुन बाहेर जाणार कोण? नावं आलं समोर...

मशिदीवरील भोंग्यांवर प्रतिक्रिया:

सोनू निगम एकदा मशिदीवरील लाऊडस्पीकरवर अजान वाजवल्याबद्दल बोलला होता. त्याच्या या वक्तव्यामुळे सोनूला केवळ देशातच नव्हे तर जगभर ट्रोल केले होते. त्याने दोनवेळा या प्रकरणावर वक्तव्य केले होते. ज्यामुळे त्याला खुप ट्रोल करण्यात आलं होते.

राधे माँ बद्दल वक्तव्य:

सोनू निगम हा त्याच्या परखड वक्तव्यासाठी ओळखला जातो. सोनूने एकदा राधे माँ चा बचाव केला होता. जेव्हा राधे माँ लहान कपडे परिधान केल्यामुळे ट्रोल झाली होती तेव्हा सोनूने तिचा बचाव करत तिची हिंदू धर्मातील देवीशी तुलना केली गेली होती. यानंतर लोकांनी त्याला खुप ट्रोल केले होते.

MeToo वेळी अनु मलिकचा बचाव केला-

MeToo मुव्हमेंटमध्ये अनेक कलाकारांची नावं समोर आली, ज्यांच्यावर अभिनेत्रींनी कास्टिंग काउच आणि लैंगिक छळाचे आरोप केले. यावेळी सोना महापात्राने अनु मलिक यांच्यावर छेडछाडी केल्याचा आरोप केला होता. तेव्हा सोनूने अनुला पाठिंबा देत पुरावा कुठे आहे, असा सवाल केला. त्यावेळीही सोनू खुप चर्चेत आला होता.

Sonu Nigam Controversies
Subhedar Movie: पुण्याच्या ट्रॉन अ‍ॅनिमेशन महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात 'सुभेदार'चं भव्यदिव्य पोस्टर लॉंच

इंडियन आयडॉलबद्दल:

सोनू निगम स्वतः इंडियन आयडॉलच्या जजच्या भूमिकेत दिसला आहे. तरी देखील त्याने या शोवर टिका केली होती. शो सोडल्याबद्दल जेव्हा त्याला विचारलं गेलं तेव्हा त्याने रिअॅलिटी शोला ट्रोल केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com