Sonu Nigam-Shaan : 'मुंबई खरंच सुरक्षित आहे का, आता याच शहरात...' गायक शानची खंत

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर आता बॉलीवूडमधील अनेक गायक पुढे आले आहेत.
Sonu Nigam-Shaan
Sonu Nigam-Shaan

Sonu Nigam Mumbai Incident Shaan Indian Singer : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर आता बॉलीवूडमधील अनेक गायक पुढे आले आहेत. यासगळ्यात प्रख्यात गायक शाननं देखील या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्या घटनेनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळ्याच प्रकारचे वातावरण आहे.

सोनू निगमच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. सोनू निगमचा मुंबईतील चेंबूर येथे एक लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. शो झाल्यानंतर सोनू सोबत सेल्फी घेण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र ते गर्दी असल्यामुळे काही शक्य झाले नाही. आणि सोनूनं देखील त्याला विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या आयोजकानं त्याला धक्काबुक्की केली होती.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सोनूचा मित्र आणि प्रसिद्ध गायक शाननं देखील सोनूवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यानं इंडियन सिंगर्स राईट्स असोसिएशनच्या वतीनं एक पत्र व्हायरल केले आहे. त्यामध्ये शाननं शहर आणि शहरातील सुरक्षा यासंबंधी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शाननं म्हटलं आहे की, सोनूच्या बाबत जे झालं ते गंभीर आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी.

सोनूवर हल्ला झाला ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या घटनेनंतर आम्ही सर्व गायक चिंतेत आहोत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकार आणि कायद्याशी संबंधित व्यक्तींना भेटून एक निवेदन देणार आहोत. सोनूच्या बाबत जो प्रकार घडला तो पुन्हा होता कामा नये. याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. असेही शाननं म्हटले आहे.

मुंबईसारख्या शहरात असे प्रकार व्हायला लागल्यानं भीती वाटते आहे. जे शहर कायदा सुव्यवस्थेसाठी ओळखले जात होते. त्याच शहरामध्ये असे प्रकार होणे ही गंभीर गोष्ट आहे. ज्यानं कुणी ते कृत्य केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मी तर प्रशासनाला आवाहन करेल की त्यांना या प्रकऱणाची तातडीनं दखल घ्यायला हवी.

Sonu Nigam-Shaan
Sonu Nigam : 'मशिदीवरील भोंग्यावर बोलणं ते...' सोनू निगमचे 4 वाद ज्यामुळे नेहमीच राहिला चर्चेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com