esakal | 'सारखं कौतुक केलं तर, मुलं बिघडतील' सोनूचं रिअ‍ॅलिटी शोवर मत
sakal

बोलून बातमी शोधा

sonu nigam

'सारखं कौतुक केलं तर, मुलं बिघडतील' सोनूचं रिअ‍ॅलिटी शोवर मत

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध गायक सोनू निगमने (sonu nigam) अनेक रिअ‍ॅलिटी शोचे परिक्षण केले आहे. सोनूने काही दिवसांपुर्वी 'इंडियन अयडॉल' शोमधील मेलोड्रामाबद्दल त्याचे मत व्यक्ते केले होते. तेव्हा तो म्हणाला होता, 'रिअ‍ॅलिटी शोजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मेलोड्रामाला लोकांची सहानुभूती मिळते, आणि म्हणूनच ते वारंवार दाखवलं जातं'. नुकतेच त्याने एका मुलाखतीमध्ये शोमधील परीक्षकांच्या परीक्षणावर आपलं मत व्यक्त केले आहे. (sonu nigam opposes always praising contestants on reality shows pvk99)

सतत कौतुक करणे म्हणजे मुलांना बिघडवण्यासारखे आहे

सोनू निगमने ई टाइम्सला मुलाखतीमध्ये सांगितले की, 'सर्वसाधारणपणे आपल्याकडे परीक्षक हे स्पर्धकांना काही तरी शिकवण्यासाठी असतात. परीक्षकांनी स्पर्धकांना प्रामाणिकपणे त्यांचे मत सांगणे अपेक्षित असते. सतत स्पर्धकांचे कौतुक करण्यात काहीच अर्थ नसतो. परीक्षकांनी सतत स्पर्धकांचे वा वा म्हणत कौतुक करून कसे चालेल? असे करणे म्हणजे मुलांना बिघडवण्यासारखेच नाही का. परीक्षकांना मुलांना बिघडवायचे नाही तर घडवायचे आहे. परीक्षक सतत स्पर्धकांचे कौतुक करत राहिले तर स्पर्धकांना ते कधी चुकले ते कधी कळणारच नाही.'

हेही वाचा: बॉलिवूडमधील 'sisters' चा हटके 'फॅशन सेन्स' एकदा पहाच!

'इंडियन आयडॉल' हा शो त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या मेलोड्रामामुळे वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. इंडियन आयडल १२ संदर्भात अमित कुमार यांनी सांगितले होते की, या कार्यक्रमात गेल्यावर निर्मात्यांनी मला स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते. अमित कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. किशोर कुमार यांना समर्पित केलेल्या एपिसोडवरुन निर्माण झालेल्या वादावर देखील सोनूने आपले मत व्यक्त केले होते. तेव्हा तो म्हणाला होता, 'अमित कुमार ही खूप मोठी व्यक्ती आहे. सर्वांत पहिली गोष्टी म्हणजे ते आमच्या उस्ताद म्हणजेच किशोर कुमार यांचे पुत्र आहेत. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त ही इंडस्ट्री पाहिली आहे. आमच्यापेक्षा अधिक जग त्यांनी पाहिलंय. अत्यंत साध्या स्वभावाची व्यक्ती आहे ती. कधीच कोणाला काही बोलत नाहीत. त्यांच्या शांततेचा तुम्ही फायदा घेत आहात. ' 'सा रे ग म प' आणि 'इंडियन आयडॉल' या शोचे सोनूने परीक्षण केले आहे.

हेही वाचा: तो फोटो अमिताभ यांचा नाहीच, नेटकरी म्हणाले 'हा तर...'

loading image