सोनू निगमसह पत्नी, मुलालाही कोरोनाची लागण | Sonu Nigam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonu nigam

सोनू निगमसह पत्नी, मुलालाही कोरोनाची लागण

प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमसह (Sonu Nigam) त्याच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनूने मंगळवारी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. पत्नी, मुलगा आणि मेहुणीच्या कोविड चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचं त्याने सांगितलं. सोनू निगम सध्या त्याच्या कुटुंबासह दुबईत राहत आहे. एका शोच्या शूटिंगसाठी त्याला भुवनेश्वरला जायचं होतं. मात्र कोरोनाची लागण झाल्याने तो आणि त्याचे कुटुंबीय क्वारंटाइनमध्ये राहत असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

अनेक वेळा चाचणी केल्यानंतरही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून लक्षणं सौम्य आहेत, अशी माहिती सोनूने दिली. "आपल्याला काळजी घेतली पाहिजे. पण घाबरू नका. यावेळी कोरोना थोडा वेगाने पसरत आहे. मला थिएटरच्या लोकांसाठी, चित्रपट निर्मात्यांसाठी वाईट वाटतंय. कारण गेल्या दोन वर्षांत आम्हा सर्वांच्या कामावर परिणाम झाला आहे", असं सोनू या व्हिडीओत म्हणाला.

हेही वाचा: 'सुकलेला नाना पाटेकर'; सलमानने बिचुकलेची उडवली खिल्ली

याआधी प्रेम चोप्रा, डेलनाज इरानी, जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया, एकता कपूर, सुमोना चक्रवर्ती यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मंगळवारी मोठी वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत मुंबईत १० हजार ८६० रुग्ण आढळले. गेल्या नऊ महिन्यांतील ही उच्चांकी रुग्णवाढ आहे. राज्यभरात कोरोनाचे १८,४६६ नवे रुग्ण आढळले, तर ७५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ६५३ झाली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top