Sonu Sood Video: सोनू सूदच्या चाहत्यांची क्रेझ काही कमी होईना! 2500 किलो तांदूळ वापरुन केला नवा विक्रम

Sonu Sood Video
Sonu Sood VideoEsakal

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा नेहमी त्याच्या दानशुर कृत्यांमुळे चर्चेत असतो. त्याला गरजू लोकांचा 'मसिहा' देखील म्हटलं जात. कोरोना काळात त्याने केलेल्या उदात्त कार्यामुळे चाहत्यांच्या हृदयात त्यांने त्याची वेगळीच जागा निर्माण केली आहे. सोनू सूद त्याच्याकडे आलेल्या सर्वच गरजू लोकांची मदत निस्वार्थपणे करत असतो.

Sonu Sood Video
Hema Malini Video: चक्क मेट्रोत बसंती, रिक्षातूनही ड्रीम गर्लनं केला प्रवास, प्रवाशांना बसला शॉक..

त्यामुळेच सोनू सूदचे आभार मानन्यासाठी त्याचे चाहते त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपले काहीतरी करत असतात. त्याचे चाहते त्याच्यावर खुप प्रेम करतात यात काही वाद नाही. सोनू सूदवर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे चाहते वेगवेगळ्या युक्त्या करत असतात.

पण अलीकडेच एका चाहत्याने असे काही केले की तो एक विक्रम झाला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनू सूदवरील चाहत्यांच्या प्रेमाचे लोक खूप कौतुक करत आहेत. त्याच्या चाहत्यांनी सोनू सूदचा 2500 किलो तांदळाचा वापर करुन जमिनीवर एक मोठा फोटो बनवला आहे.

Sonu Sood Video
Salman Khan Case: सलमान खान विरुद्धचा खटला कोर्टानं फेटाळला; म्हणाला, 'सेलिब्रिटी असल्यामुळे'

अभिनेता सोनू सूदच्या काही चाहत्यांनी 2,500 किलो तांदूळ वापरून त्याचा फोटो बनवला आहे, असे IANS च्या वृत्तात म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील देवास येथील तुकोजी राव पवार स्टेडियममधील चाहते आणि एका स्वयंसेवी संस्थेने 1 एकरपेक्षा जास्त जमिनीवर 2500 किलो तांदूळ वापरून सोनू सूदचे पोर्ट्रेट बनवले.

एक एकर जागेत बनविण्यात येणाऱ्या या फोटोसाठी वापरण्यात आलेला तांदूळ 'हेल्पिंग हँड्स' एनजीओ द्वारे ज्या कुटुंबांना अत्यंत गरज आहे आणि ज्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत अशा गरजूंना दान करण्यात येणार आहे.

Sonu Sood
Sonu Sood
Sonu Sood Video
Sushmita Sen: 'रस्त्यावर कचरा फेकताना दिसली सुष्मिता', नेटकऱ्यांनी दिले स्वच्छतेचे धडे...

कृतज्ञता व्यक्त करताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, 'मला प्रत्येक वेळी मिळणारे प्रेम आणि कौतुक अवास्तव आहे. इतरांना मदत करण्यासाठी चाहते त्यांच्या क्षमतेनुसार हे सर्वकाही करत आहेत ते मला आवडते. हे सर्व पाहल्यानंतर माझं मन भरून येतं. मी याच्यापेक्षा जास्त आभारी आणि कृतज्ञ असू शकत नाही.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या जॅकलिन फर्नांडिससोबत त्याच्या 'फतेह' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. 'रोडीज'च्या आगामी सीझनमध्येही तो दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com