
Sonu Sood: हे फक्त सोनू सूदच्या बाबतीतच घडू शकतं.. बिहारमध्ये अभिनेत्याच्या नावानं चक्क उभारलं जातंय..
Sonu Sood: अभिनेता सोनू सूद नुकताच बिहारच्या एका अभियंताला भेटला ज्याने आपली नोकरी सोडली आणि आता अनाथ मुलांसाठी शाळा सुरू करतोय अन् त्या शाळेचे नाव त्यानं ''सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल " ठेवलं आहे. अभिनेता सोनू सूद या शाळेसाठी नवीन मोठी इमारत बांधणार आहे आणि त्याचा उपयोग वंचित मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी करणार आहे.
27 वर्षीय बिहारमधील अभियंता बिरेंद्र कुमार महातो हा तरुण अनाथ मुलांसाठी शाळा उघडण्यासाठी आपली पूर्णवेळ नोकरी सोडतो हे वाचून सोनू सूदआश्चर्यचकित झाला आणि त्यानं या तरुणाच्या चांगल्या हेतूला साथ द्यायची ठरवली. पण त्याआधीच समोर आलं ते म्हणजे या तरुणानं त्या शाळेचं नाव चक्क 'सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल' असं ठेवलं.
110 मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांना जेवण देण्याच्या या तरुणाच्या महत्त्वपूर्ण कामाने सोनू प्रेरित झाला आणि सोनूने महतो आणि शाळेतील मुलांची भेट घेतली. (Sonu Sood international school actor associated with bihar)
शाळेतील मुलांच्या गरजा समजून घेण्यासाठी या अभिनेत्याने महतोसोबत खास वेळ घालवला. रेशनपासून ते दर्जेदार शिक्षणापर्यंत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि श्रीमंत आणि गरीब मुलांमधील शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी सोनू आता प्रयत्न करणार आहे.
सोनू सूदने या शाळेसाठी नवीन इमारतीचे काम सुरू केले असून जेणेकरून अनेक वंचित मुलांना येथे राहता येईल आणि शाळेत प्रत्येक मुलासाठी जेवण उपलब्ध होईल याची खात्री करुन घेतली जाणार आहे.
" मुलांना शिकवून गरिबीचा सामना करणं हा एक उत्तम मार्ग आहे. समाजातील उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षित करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरून त्यांना नोकरीच्या अधिक चांगल्या संधी मिळतील. उच्च शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही काम करत आहोत. त्यांच संगोपन उत्तम रित्या व्हावं आणि त्यांचा विकास व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. ही शाळा वंचित मुलांसाठी एक निवारा देखील ठरणार आहे " अस सोनू म्हणाला.
सध्या सोनू सूद देशभरात सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात हातभार उचलत आहे आणि हे नक्कीच उल्लेखनीय आहे.