Lalbaug Cha Raja: लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या गर्दीत फराह खान, सोनू, मानुषीचे 'हाल'! व्हिडिओ व्हायरल

Sonu Sood Manushi Chhillar Farah Khan At Lalbaugcha Raja
Sonu Sood Manushi Chhillar Farah Khan At Lalbaugcha Raja
Updated on

Sonu Sood Manushi Chhillar Farah Khan At Lalbaugcha Raja: सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी लोक गर्दी करत आहेत. यात मोठे कलाकारही विविध ठिकाणी गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी जाताना दिसत आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक कलाकार जातात. ज्यात शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, सनी लिओनी, अदा शर्मा असे अनेक कलाकर दिसले.

सर्वसामान्य लोकांना बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत असताना कलाकारांना व्हीआयपी दर्शनाची सोय आहे. याबद्दल अनेक लोकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. तर काही कलाकार हे VIP दर्शन न घेता गर्दीत रांगेत उभे राहणं पसंत करतात.

यामध्ये मानुषी छिल्लर, सोनू सूद, फराह खान, शेखर सुमन, स्मृती इराणी यांसारखे सेलिब्रिटी गणपतीच्या दर्शनासाठी सर्वसामान्यांसोबत गर्दीत उभे राहिलेले दिसले. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर बाप्पाच्या दर्शनासाठी आईसोबत गर्दीत उभी होती. सर्वसामान्य लोकांसोबत उभं राहून त्यांच्या समस्या समजून घेत तिनं बाप्पाचं दर्शन घेतलं.

मानुषीसोबतच शेखर सुमन, सोनू सूद आणि फराह खान देखील व्हीआयपी दर्शनाचा लाभ न घेता सामान्य लोकांसोबत गर्दीत रांगेत उभे राहत बाप्पाचे दर्शन घेतले.

सध्या या कलाकाराचे व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याचे कौतुक करत आहे. बाकिच्या सेलिब्रिटींनी त्याच्याकडून शिकावं अशा कमेंटही या व्हिडिओवर नेटकरी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.