गरजूंना मदत करण्यासाठी सोनू सुदने गहाण ठेवली स्वतःची एवढी मालमत्ता

sonu sood
sonu sood

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन अनेकांचा प्रश्न निर्माण झाला होता. याच दरम्यान अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. रोजगार नसल्यामुळे अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता. यात परराज्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पण लॉकडाऊनमुळे परतण्याचे कोणतेही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे काहींनी तर पायपीट करत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान अभिनेता सोनू सुद या गरजु लोकांच्या मदतीसाठी देवदूत बनला होता

अभिनेता सोनू सूदने लोकांना त्यांच्या गावी पोहचवण्यापासून त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळवून देण्यासाठी मोलाची मदत केली. अनेकांची घरं देखील त्याने बांधून दिली. त्यातच आता आणखी एक पाऊल पुढे जात त्याने गरजूंची मदत करण्यासाठी आपल्या स्वतःच्या आठ मालमत्ता गहाण ठेवत, 10 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. 48 वर्षीय सोनू सूद आणि त्याची पत्नी सोनाली यांच्या नावावर या सर्व मालमत्ता आहेत. यामध्ये दोन दुकानं आणि सहा अपार्टमेंट यांचा समावेश आहे. मुंबईचा हायक्लास एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुहूमध्ये या सर्व मालमत्ता आहेत.

मनीकंट्रोलकडे उपलब्ध असलेल्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, सोनूने जुहू येथील शिव सागर सीजीएचएस मधील तळ मजल्यावरील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट गहाण ठेवले आहेत. ही इमारत मुंबईतील इस्कॉन मंदिराजवळ एबी नायर रोडलगत आहे. 15 सप्टेंबर रोजी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेबरोबर सोनू सूदने करार केला आणि 24 नोव्हेंबर रोजी कर्जाची नोंद झाली. सोनू सूदने 10 कोटी कर्जासाठी नोंदणी फी म्हणून 5 लाख रुपये दिले आहेत. आता तर सोनू सूदच चाहत्यांमध्ये त्याच्याविषयीचा आदर आणखीनच वाढला आहे. 

sonu sood mortgages 8 juhu properties to raise rs 10 crore for needy report  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com