'या' दिवशी येतंय 'कोण होणार करोडपती'.. रंगणार ज्ञानियांचा खेळ.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kon honar karodpari

'या' दिवशी येतंय 'कोण होणार करोडपती'.. रंगणार ज्ञानियांचा खेळ..

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार असून या पर्वाच्या तारखा नुकत्याच जाहिर झाल्या आहेत. (kon honar karodpati)

हेही वाचा: 'ज्युनिअर एनटीआर'वर झाला होता बालविवाहाचा आरोप.. अल्पवयीन मुलीशी..

या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. 'आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असं या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. या पर्वाच्या तारखा जाहिर झाल्या असून हा कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

याही पर्वाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. गेल्या पर्वातही सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आवाज यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीनी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचं महत्त्वाचं काम सचिन खेडेकर लीलया पार पाडतात. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी होत असतात. प्रत्येक स्पर्धकाचा जीवनसंघर्ष जाणून घेऊन, त्याला कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांना बोलतं करून सचिन खेडेकर सूत्रसंचालकाची धुरा उत्तमरीत्या सांभाळतात. प्रेक्षकांमध्येही 'कोण होणार करोडपती', या कार्यक्रमाविषयी उत्सुकता असते.

Web Title: Sony Marathi Kon Honar Crorepati Show Will Be Starding On 6 June

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top