मराठीला मिळणार कानडी तडका.. येतीय नवी मालिका..'जिवाची होतिया काहिली'

सोनी मराठी वाहिनीवर एक नवा विषय घेऊन 'जीवाची होतिया काहिली' ही मालिका सज्ज झाली आहे.
sony marathi new serial jevachi hotiya kahili telecast on 18njuly
sony marathi new serial jevachi hotiya kahili telecast on 18njuly sakal

सोनी मराठी वाहिनी सातत्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका या वाहिनीवर प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. असाच एक भन्नाट विषय घेऊन एक नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. 'जिवाची होतिया काहिली' असे या मालिकेचे नाव असून मराठी सोबत कानडी भाषेचा बाज या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. (sony marathi new serial jevachi hotiya kahili telecast on 18 july)

sony marathi new serial jevachi hotiya kahili telecast on 18njuly
आसाम वासीयांच्या मदतीला बॉलीवूड धावलं,'या' कलाकारांनी केली लाखोंची मदत..

या मालिकेत मराठी मुलगा आणि कानडी मुलगी यांच्या प्रेमाची कहाणी दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.

प्रेमाला भाषा नसते, हे दाखवणारी ही मालिका आहे. मालिकेची झलक सध्या प्रदर्शित झाली असून मुख्य कलाकरांबरोबरच नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ते म्हणजे विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे विद्याधर जोशी हे कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना भावला आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहतात, त्यांच्यातील तंटे, वाद आणि प्रेम हे सर्व पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com