esakal | सेल्फी घ्यायला गेली, दरीत पडली; मॉडेलनं गमावला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

sofiya model

सेल्फी घ्यायला गेली, दरीत पडली; मॉडेलनं गमावला जीव

sakal_logo
By
युगंधर ताजणे

सेल्फी (selfi) घेताना काय काळजी घ्यावी हे सांगणे आता काही नवीन राहिलेलं नाही. विशेषत तरुणाई सेल्फी घेण्याच्या निमित्तानं जीवाला मुकल्याची अनेक उदाहरणे दिसून आली आहेत. पावसाळ्यात पर्यटनासाठी (tourist) गेलेल्या पर्यटकांनी सेल्फीमुळे जीव गमावल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असाच एक प्रकार आता एका मॉडेलच्या बाबतीत घडलाय. ती एका ठिकाणी फिरायला गेली होती. तिथे सेल्फी घेण्याचा मोह तिला महागात पडलायं. (sophia cheung lost her life while taking selfie she fell into a deep waterfall yst88)

सोफिया चिंग (sofiya cheung) या 32 वर्षीय मॉडेलचा सेल्फी घेण्याच्या नादात जीव गेला आहे. ती एका खोल दरीत पडली आहे. सोशल मीडियावर इन्फ्लुंसर म्हणून ती प्रसिध्द होती. तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. तिच्या जाण्याचे वृत्त कळताच तिच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचं झाले असे की, सोफियाला एका उंचावरच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेऊन आपल्या चाहत्यांना इंप्रेस करायचे होते. मात्र तिचा तो प्रयत्न जीवावर बेतला आहे.

सेल्फी घेण्याचा अट्टाहास किती भयानक असू शकतो याचा प्रत्यय सोफियाच्या घटनेच्या निमित्तानं आला आहे. हाँगकाँगमधील प्रख्यात मॉडेल म्हणून ती नावारुपास आली होती. सोफिया ही आपल्या मित्रांसमवेत हाँगकाँगच्या एका पार्कमध्ये गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. या अपघातानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पाइनअॅपल नावाच्या पर्वतीय भागामध्ये हा अपघात घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: मम्मा 'करीना' आणि बेबी ‘जेह’चे क्युट फोटो व्हायरल

हेही वाचा: युवराज, हर्षवर्धन, लिएंडरच नाही.. तर यांच्यासोबतही जोडलं गेलं किमचं नाव

सोशल मीडियावर 24 हजारांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या सोफीच्या जाण्यानं तिच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ती एक साहसी मॉडेल होती. वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंटमध्ये तिचा असणारा सहभाग चाहत्यांसाठी आगळी वेगळी पर्वणी असायची. आपल्या तरुण चाहत्यांना प्रेरित करण्याचे काम सोफिया सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होती.

loading image