Bebhan: साऊथ अभिनेत्यासोबत झळकणार मृण्मयी देशपांडे.. येतोय ‘बेभान’..

‘बेभान’ या आगामी मराठी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
south actor anupsingh thakur debut in marathi movie bebhan with actress mrunmayee deshpande
south actor anupsingh thakur debut in marathi movie bebhan with actress mrunmayee deshpandesakal

bhebhan : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande) म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाची अभिनेत्री. मृण्मयीने आजवर अनेक मालिका, चित्रपट केले. केवळ अभिनयच नाही तर तिने दिग्दर्शनातही पाय रोवले. लवकरच तिचा 'बेभान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्या जोडीला एक दाक्षिणात्य अभिनेता असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले.

मराठी चित्रपाटांच्या दर्जेदार आशयामुळे सर्वांचेच लक्ष मराठी चित्रपटांकडे लागलेले असते. सध्या बॉलीवुड प्रमाणे अनेक अमराठी निर्माते आणि कलाकार मराठी चित्रपटांकडे वळत आहेत. अशीच एक कलाकार मराठी चित्रपटातून आपले नशीब आजमावणार आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमांमधून झळकलेला अभिनेता अनुपसिंग ठाकूर (Anupsingh Thakur) मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

अभिनयासोबतच बॉडीबिल्डिंग स्पर्धांमधून देखील त्याने आपले नाव कमवले आहे. शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘बेभान’ (Bebhan) या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

मधुकर (अण्णा) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ असे उत्तम चित्रपट केल्यानंतर ‘बेभान’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्यासाठी घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित आगामी ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कमालीची आहे. ‘रावरंभा’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी ‘रावरंभा’चं लेखन केलं आहे. ‘बेभान’ चित्रपटाची कथा दिनेश देशपांडे यांची असून, पटकथा नितीन सुपेकर यांची आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी काम पाहिले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचे संगीत लाभले आहे.

अनुपसिंग ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून जरी हा चित्रपट रोमॅंटिक असेल, असा अंदाज बांधता येत असला तरी अभिनेता अनुपसिंग ठाकूर असल्याने चित्रपटात अ‍ॅक्शन देखील पहायला मिळेल का?, यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. येत्या 11 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com