esakal | कोरोना पेशंटसाठी अभिनेत्यानं विकली 'बुलेट'

बोलून बातमी शोधा

south actor harshvardhan rane
कोरोना पेशंटसाठी अभिनेत्यानं विकली 'बुलेट'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं सर्वांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा जोर वाढत चालला आहे. आता 18 ते 45 वयोगटातील सर्वांना व्हॅक्सिनेशन घेण्याचे आवाहन सरकारनं केलं आहे. अशावेळी काही रुग्णांना रुग्णालयात उपचार घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे, सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. बेडची कमीही आहे. त्यातच पुरेशा प्रमामात कोरोना रुग्णांना देण्यात येणारी औषधेही कमी पडत असल्यानं रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अशावेळी बॉलीवूडमधील सेलिब्रेटी आता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

देशात असे काही सेलिब्रेटी आहेत की, त्यांनी आता कोरोना रुग्णांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात मदत करायला सुरुवात केली आहे. यात नावं सांगायची झाल्यास अजय देवगण, अक्षय कुमार, सोनु सुद, विद्या बालन, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन यांची नावं सांगता येतील. त्यात साऊथच्या हर्षवर्धन राणेचही नाव सांगता येईल. त्यानं कोरोना रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी पैसे उभारण्याकरिता आपल्या आवडीची दुचाकी विकली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात हर्षवर्धन आणि त्याची यलो कलरची रॉयल एन्फिल्ड दिसते आहे.

ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यावेळी हर्षवर्धननं 2014 साली खरेदी केलेली दुचाकी विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. चाहत्यांनीही त्याचे कौतूक केले आहे. काही करुन गरजवंतांना ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध करुन देता येतील या उद्देशानं त्यानं आपली आवडती गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी हर्षवर्धननं एक पोस्ट शेअर केली तेव्हा त्यानं सांगितले की, माझी मदत करा. हैद्राबादमध्ये कॉन्सट्रेटर शोधण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये हर्षवर्धनलाही कोरोना झाला होता. त्यावेळी त्याला आयसीयुमध्येही दाखल करण्यात आले होते. तेव्हा तो चार दिवस ऑक्सिजन सपोर्टवर होता. कोरोनाच्या पेशंटला मदत करणारा हर्षवर्धन हा काही एकटाच कलावंत नाही. त्याच्याशिवाय व्टिकंल खन्ना, भूमी पेडणेकर, गुरमीत चौधरी यांनीही सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.