esakal | केंद्राकडून परवानगी, सुपरस्टार रजनीकांत जाणार अमेरिकेला...
sakal

बोलून बातमी शोधा

actor rajnikanth

केंद्राकडून परवानगी, सुपरस्टार रजनीकांत जाणार अमेरिकेला...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (south star rajinikanth) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे ते आता अमेरिकेला जाणार आहेत. त्याठिकाणी ते आपले मेडिकल चेक अप करुन घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना केंद्र सरकारनं (central government allowed) परवानगी दिली आहे. त्यांच्यासाठी एका खास विमानाची सोयही करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे जावई व मुलगी असणार आहे. ( south superstar rajinikanth gets permission from central government travel us for medical check up)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये (tollywood film industry) देवा समान ज्यांना पुजले जाते असे अभिनेते म्हणून रजनीकांत यांची ओळख आहे. सध्या रजनीकांत यांचे जावई धनुष हे अगोदरच आपल्या पत्नी, मुलांसोबत अमेरिकेत आहे. त्याठिकाणी ते हॉलीवूडमधील एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. असं सांगितलं जात आहे की, ज्यावेळी रजनीकांत हे अमेरिकेत तपासणीसाठी जातील तेव्हा ते त्यांच्यासोबत असतील.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत हे कोरोनाचं व्हॅक्सिन घेतल्यानंतर चर्चेत आले होते. त्यांनी त्यावेळी कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर त्यांची मुलगी सौंदर्यानं व्हॅक्सिन घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये रजनीकांत व्हॅक्सिन घेताना दिसून आले. त्या फोटोची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांचे प्रवक्ते रियाज अहमदनं सांगितलं की, त्यांनी चेन्नईमधील एका रुग्णालयामध्ये ते व्हॅक्सिन घेतले होते.

हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा बारकाईने अभ्यास सुरू - CBI

रजनीकांत यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी काही सांगायचे झाल्यास, ते अन्नात्थे चित्रपटात दिसणार आहे. त्यात त्यांनी एका ग्राम अध्यक्षाची भूमिका केली आहे. या चित्रपटाची शुटिंग लॉकडाऊनपूर्वी पूर्ण झाली होती. मात्र त्याच्या डबिंगचे काम अद्याप बाकी आहे. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

loading image