Natu Natu Song Golden Globe: जरा उशीर झाला असता तर.. वाचा, युक्रेनचं युद्ध आणि नाटु गाण्याचं खास कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

special connection between natu natu song and ukraine war

Natu Natu Song Golden Globe: जरा उशीर झाला असता तर.. वाचा, युक्रेनचं युद्ध आणि नाटु गाण्याचं खास कनेक्शन

Natu Natu Song Golden Globe: नाटु नाटु गाण्याने जगप्रसिद्ध गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळवला. नाटू नाटू चे संगीतकार आहेत एम एम केरावनी. पुरस्कार जाहीर झाल्यांनतर केरवानी यांनी मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजिनल सॉन्ग चा मानाचा पुरस्कार केरवानी यांनी आपल्या नावावर केला. 'नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट सॉन्गच्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं.

(special connection between natu natu song and ukraine war)

हेही वाचा: Krrish 4: 'क्रिश ४'ची भरारी लांबणीवर!.. हृतिकनेच संगितलं सिनेमा रखडण्याचं कारण..

या गाण्याची खास गोष्ट अशी हे गाणं युक्रेनमध्ये शूट झालंय. रशिया - युक्रेन युद्धाच्या काही महिने आधीच नाटू नाटू गाण्याचं शूटिंग झालेलं. युक्रेन हे भारतीय फिल्ममेकरचे शूटिंगसाठीचे आवडते ठिकाण आहे. 2021 ला, रशिया आणि युक्रेनने कोविड-19 दरम्यान पर्यटकांसाठी आपले दरवाजे घडून शूटिंगला सुद्धा परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी RRR सिनेमाचे काही महत्त्वाचे भाग युक्रेनमध्ये शूट झाले आहेत. याच शूटिंगदरम्यान युक्रेनमधील प्रसिद्ध अशा मरिंस्की पैलेस मध्ये ऑगस्ट २०२१ ला नाटू नाटू गाण्याचं शूटिंग झालं. मरिंस्की पैलेस हे युक्रेन राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे.

v

हेही वाचा: Apurva Nemlekar: अण्णांची शेवंता दिसणार मांजरेकरांच्या चित्रपटात.. अपूर्वानेच सांगितली..

फेब्रुवारी २०२२ ला रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्याच्या काहीच महिने आधी नाटू नाटू गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये पार पडलं. नाटू नाटू गाण्याचे संगीत, त्यातला डान्स अशा सगळ्याच गोष्टींची सुरुवातीपासून चर्चा झाली. यु ट्यूब वर या गाण्याने करोडो प्रेक्षकांचा टप्पा ओलांडला. आजही हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग वर आहे.

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमात हे गाणं असून ज्युनियर एनटीआर आणि राम चरण या कलाकारांनी या सिनेमात भूमिका साकारल्या होत्या. आलिया भट्ट आणि अजय देवगण अशा लोकप्रिय कलाकारांनी सिनेमात भूमिका साकारल्या. गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्याने नाटू नाटू गाण्याची आणि RRR सिनेमाची जागतिक पातळीवर विशेष दखल घेण्यात आल्याने भारतीयांची मान उंचावली आहे.