
12 जानेवारी हा दिवस भारतात युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा कोलकाता येथे जन्म झाला होता. त्यांची जीवनगाथा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.
मुंबई - बॉलीवूडमध्ये स्टार पदापर्यंत पोहचायचे झाल्यास पाठीशी कुणाचा हात असावा लागतो. थोडक्यात कुणी गॉडफादर हवा असतो हे आतापर्यंतच्या बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांच्या करिअरवरुन दिसून आले आहे. आजही इंडस्ट्रीमध्ये असे कलाकार आहेत ज्यांच्य़ामागे गॉडफादर आहे. मात्र असे काही अभिनेते आहेत ज्यांना कुणाच्याही आधाराची किंवा शिफारशीची गरज फारशी जाणवली नाही. ते त्यांच्या कामामुळे मोठे झालेले कलाकार आहेत. युथ डे च्या निमित्तानं नवोदित तरुण कलाकारांच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.
12 जानेवारी हा दिवस भारतात युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा कोलकाता येथे जन्म झाला होता. त्यांची जीवनगाथा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांनी आपल्या युवावस्था मध्ये अनेकांना प्रेरित केले. जगण्याचा मार्ग समजावून सांगितला. युवावस्थेत असताना ते सर्वांसाठी प्रेरणास्थान बनले होते. बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे कुणाच्या आधाराविना स्वबळावर मोठे झाले आहेत. त्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.
'सैफच्या पोराची उडवली टर, मोक्कार हशा'
1. विकी कौशल - विकी आणि चित्रपटांचं नातं फार जूने आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की विकी कौशल हा प्रसिध्द स्टंट डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा आहे. विकीनं गँग्स ऑफ वासेपूरमध्ये अनुरागला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मदत केली होती. काही चित्रपटांमध्ये त्यानं साईड रोलही केले. मात्र प्रमुख कलाकार म्हणून त्याचा पहिला चित्रपट 2015 मध्ये आलेला मसान हा होता. 2019 मध्ये आलेल्या उरी या चित्रपटानं त्याला हिरो बनवलं.
2. टाइगर श्रॉफ - प्रसिध्द कलाकार जॅकी श्रॉफ याचा मुलगा अशीच केवळ टायगरची ओळख नाही. तर त्यानं ती वेगळया प्रकारची निर्माण केली आहे. डान्स आणि अॅक्शन यासाठी टायगर प्रचंड लोकप्रिय आहे. 2016 मध्ये आलेल्या त्याच्या बागी या चित्रपटानं मोठ्ठ यश मिळवलं. त्यानंतर त्याच्या चित्रपटांना ब्रेक लागला. मात्र 2019 मध्ये ऋतिकसोबत आलेल्या टायगरच्या एका चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
3. रणवीर सिंह - बॉलीवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत ज्यांनी कमी कालावधीत फार मोठी मजल मारली. त्याचे नाव म्हणजे रणवीर सिंह. त्याने आपल्या कामाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सध्या बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सोशल मीडियावरही तो नेहमीच अॅक्टिव्ह असणारा अभिनेता आहे. 2010 मध्ये त्यानं बँड बाजा बरात या चित्रपटातून पदार्पण केले होते.
4. राजकुमार राव - बराच काळ वाट पाहिल्यानंतर राजकुमारच्या नावावर यश जमा झाले. त्यानं 2010 मध्ये लव सेक्स और धोका चित्रपटातून पदार्पण केले होते. त्या चित्रपटाला फार मोठ्या प्रमाणात यश काही मिळाले नाही. मात्र त्याच्या अभिनयातील झलक ठळकपणे जाणवली. त्यानंतर राजकुमार राव त्याच्या ओमार्टा, स्त्री, शाहिद, न्युटन, सिटीलाईट सारख्या चित्रपटांमधून प्रसिध्द झाला.
5. आयुष्मान खुराणा - सध्या बॉलीवूडमध्ये कोण लंबी रेस का घोडा है असे विचारल्यास त्याचे उत्तर आयुषमान खुराणा असे द्यावे लागेल. 2012 मध्ये त्यानं विकी डोनर चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात हिट झाला होता. सध्या बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत आयुषमानचे नाव घेतले जाते. शुभ मंगल सावधान, बाला, आर्टिकल 15, या चित्रपटांमधून त्याच्या भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.