स्पृहा-अभिजीत 'बाबा'मध्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र

SA.jpeg
SA.jpeg

संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सनिर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ हा चित्रपट दोन ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बाबा’ या चित्रपटात दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच नाटक, सिनेमा आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील गुरु म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘बाबा’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

स्पृहा जोशी ही ‘पल्लवी’ आणि अभिजीत खांडकेकर हा ‘राजन’ नावाची व्यक्तिरेखा साकारत असून या चित्रपटात दोघेजण नवराबायको बनले आहेत. या चित्रपटातील अभिजीत आणि स्पृहा या दोघांनी एकत्र केलेले काम आणि त्यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे. ‘भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेश  ‘बाबा’ चित्रपट देतो. हा चित्रपट दोन ऑगस्ट २०१९ या दिवशी प्रदर्शित होत आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की ''मी आणि अभिजीत मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. आम्ही दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत आहोत. अभिजीत आणि मी चांगले मित्र आहोत, पण आम्ही याआधी कधीच एकत्र काम केले नव्हते. ‘बाबा’च्या माध्यमातून ती संधी चालून आली, याचा मला आनंद आहे. ‘बाबा’ ही नात्यांमधील बंधाची एक सुरेख कथा आहे. आम्हा दोघांमधील केमिस्ट्रीचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण आम्ही एकमेकांना खूपच चांगले ओळखतो.''

अभिजीत खांडकेकर म्हणाला की ''या चित्रपटात माझा लुक अगदीच वेगळा आहे. बेल बॉटम पँट तसेच चौकोनी आकाराची चष्म्याची फ्रेम या सर्व गोष्टी या व्यक्तिरेखेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूपच मजा आली. स्पृहा जोशी माझी चांगली मैत्रीण आहे तसेच मी तिला खूप वर्षापासून ओळखतो. पण तिच्याबरोबर मी कधीच काम केले नव्हते, मला या चित्रपटाच्या माध्यमातून ही संधी मिळाली याचा मला आनंद आहे’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com