Squid Game season 2 teaser Viral Netflix web series
Squid Game season 2 teaser Viral Netflix web series esakal

Squid Game 2 teaser : 'रेड लाईट, ग्रीन लाईट...' मृत्यूचा खेळ पुन्हा सुरू होणार! 'तो' म्हातारा अजून जिवंत

वेब सीरिजच्या दुनियेत आपल्या वेगळेपणामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या स्क्विड गेम्स नावाच्या मालिकेचा दुसरा सीझन आता येतोय.
Published on

Squid Game season 2 teaser Viral Netflix : वेब सीरिजच्या दुनियेत आपल्या वेगळेपणामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या स्क्विड गेम्स नावाच्या मालिकेचा दुसरा सीझन आता येतोय. ही बातमी सोशल मीडियावर येताच चाहत्यांनाच्या उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक या मालिकेच्या दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत आहेत.

नेटफ्लिक्सनं स्क्विड गेम्सच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. यापूर्वीच्या या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. सध्याचा काळ हा कोरिअन मालिकांचा आहे. या भाषेतील मालिकांचा युवावर्ग प्रचंड चाहता आहे. या देशातील म्युझिक बँडची तरुणाई फॅन आहे. कोरियन अॅनिमेशनला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

स्क्विड गेम्सचा पहिला भाग हा प्रेक्षकांना भलताच भावला होता. नेटफ्लिक्सला देखील या मालिकेमुळे खूपच फायदा झाला होता. गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्स ही भारतामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना सेक्रेड गेम्सनंतर स्क्विड गेम्सनं मोठा आधार दिला आहे. त्यामुळेच की काय या मालिकेच्या दुसऱ्या सीझनकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

कोरियन थ्रिलर शो ची क्रेझची मोठी....

स्क्विड गेम्सच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या पहिल्या सीझननंतर दुसऱ्या सीझनविषयी बोलले जात होते. प्रेक्षक, समीक्षक यांच्याकडून या मालिकेली तुफान लोकप्रियता मिळाल्यानं निर्मात्यांनी दुसरा सीझन बनविण्याची घोषणा केली. आगळ्या वेगळ्या विषयाची उत्कंठावर्धक मांडणी हे स्क्विड गेम्सचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या मालिकेचा टीझर आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांचा कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

२०२१ मध्ये या मालिकेचा पहिला सीझन आला होता. त्यानंतर दोन वर्षांनी या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या मालिकेमध्ये पुन्हा वेगळी थीम आणि पात्र यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे. पहिल्या भागातील सस्पेन्स, थरार हा चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. निर्मात्यांनी या मालिकेचा टीझर शेयर करताना लिहिलं आहे की, 'रेड लाईट....ग्रीन लाईट....'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com