साऊथच्या गायिकेवर भडकले लोक, देवाच्या कीर्तनाचं केलं रोमॅंटिक व्हर्जन Sravana Bhargavi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sravana Bhargavi: Singer Sravana in the news again … Annamayya’s kirtan turned into a romantic song and created controversy

साऊथच्या गायिकेवर भडकले लोक, देवाच्या कीर्तनाचं केलं रोमॅंटिक व्हर्जन

साऊथची प्लेबॅक सिंगर श्रवण भार्गवी (Sravana Bhargavi) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या 'ओकापारी कोकापरी' या अल्बममुळे(Album) तिच्यावर हे वादाचं(Controversy) संकट ओढवलं आहे. या व्हिडीओला श्रवणने आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केलं होते,जो आता व्हायरल झाला आहे. श्रवणने ट्रोलर्सवर कडक शब्दात पलटवारही केला आहे. लोकं फक्त महिला गायिकांनाच टार्गेट का करतात असा प्रश्न तिनं विचारला आहे. चला जाणून घेऊया नेमकं कोणत्या कारणाने श्रवण भार्गवी वादात सापडली.(Singer Sravana in the news again, Annamayya’s kirtan turned into a romantic song and created controversy)

श्रवण भार्गवीचे 'ओकापारी कोकापरी' हे गाणे १५ व्या शतकातील हिंदू संत अन्नामय्या यांच्या कीर्तनाचं नवं व्हर्जन आहे. या कीर्तनात अन्नामाचार्य भगवान व्यंकटेशच्या सौंदर्यांचे आणि आकर्षणाचे प्रशंसा करत आहेत. तर दुसरीकडे श्रवण भार्गवीने आपल्या नवीन गाण्यात साडीमध्ये दिसत आहे. तिच्या गाण्याचं हे व्हर्जनं देवाच्या नाही तर महिलांच्या सौंदर्याचे वर्णन करणारे आहे. ज्याल पूर्ण रोमॅंटिक स्टाइलने प्रेझेंट केले गेले आहे. हेच कारण आहे की भगवान व्यंकेटशच्या भक्तांना श्रवणचे हे गाणे खटकले आहे. ते या गाण्याला डिलिट करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा: The Kapil Sharma Show चे टी.व्ही वर कमबॅक, 'या' दिवशी दिसणार पहिला एपिसोड

या गाण्याला चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट करण्यात आल्या कारणाने गायिका श्रवण भार्गवीवर खूप टीका करण्यात आली आहे. कितीतरी लोकांनी गायिकेच्या या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. यावर भार्गवीनं प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की जेव्हा एखादी महिला गाणं रिलीज करते तेव्हा नेहमीच लोकांचा त्याच्यावर आक्षेप असतो.

श्रवण भार्गवी पुढे म्हणाली आहे की,''व्हिडीओत काहीही अश्लील नाही, ना हे गाणं अन्नामय्या गाण्याचा दर्जा घसरवत आहे. फक्त एक महिला गायिका जेव्हा एखादा अल्बम रिलिज करते तेव्हा लोक नेहमीच त्याच्यावर आक्षेप घेतात,तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. पण एखाद्या पुरुष गायकाने गाणं रिलीज केले की डोळे बंद करुन घेतात,त्याच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करुन''.

श्रवण भार्गवीचा जन्म १६ ऑगस्ट १९८९ साली झाला. ती एक साऊथ इंडियन प्लेबॅक सिंगर आहे. तिनं तेलुगु भाषेत खुप गाणी गायली आहेत. भार्गवीने हैदराबादमधून बीटेक मध्ये शिक्षण घेतले आहे. सध्या ती एमबीए सुद्धा शिकत आहे. तिनं ९२.७ Big FM वर एक शो देखील होस्ट केला होता.

हेही वाचा: 'मुलांना जन्म देऊ नका',असं का म्हणाली पूनम पांडे? व्हायरल व्हिडीओची चर्चा

भार्गवीच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचं झालं तर तिने ९ डिसेंबर,२०१२ ला हैदराबादस्थित गायक वेदाला हेमचंद्रा सोबत साखरपुडा केला होता,त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१३ ला त्यांचे लग्न देखील झाले होते. या कपलला एक मुलगी आहे. भार्गवीने Bol Baby Bol शो चे अॅंकरिंगही आपल्या पतीसोबत केले आहे. super singer या शो मध्ये तिने परफॉर्म देखील केले आहे.

काही दिवसांपूर्वी बातमी होती की श्रवण भार्गवीने लग्नाच्या ९ वर्षानंतर आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पण या कपलने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या घटस्फोटाविषयीच्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Sravana Bhargavi Singer Sravana In The News Again Annamayyas Kirtan Turned Into A Romantic Song And Created

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top