esakal | श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन महाराष्ट्राच्या प्रेमात; पालघरमधील दोन गावे घेतली दत्तक
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन महाराष्ट्राच्या प्रेमात; पालघरमधील दोन गावे घेतली दत्तक

कोरोना महामारीच्या काळात अनेक बॉलीवूड कलाकारांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आता त्यामध्ये सनशाईन गर्ल जॅकलिन फर्नांडिसची भर पडली आहे.

श्रीलंकन ब्यूटी जॅकलिन महाराष्ट्राच्या प्रेमात; पालघरमधील दोन गावे घेतली दत्तक

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः कोरोना महामारीच्या काळात अनेक बॉलीवूड कलाकारांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आता त्यामध्ये सनशाईन गर्ल जॅकलिन फर्नांडिसची भर पडली आहे. सध्या जॅकलिन महाराष्ट्र आणि मराठीच्या कमालीची प्रेमात पडलेली आहे. नुकतेच तिने दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा डिसायपल हा मराठी चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल
झाल्यामुळे त्याचे खूप कौतुक केले आणिआता तर तिने पालघरमधील दोन गावे दत्तक घेतली आहेत. पाथर्डी आणि सकूर अशी त्या गावांची नावे आहेत.

पेट्रोल पंपवर काम करत कविता करणा-या गुलजार यांना अशी मिळाली होती पहिली संधी - 

तीन वर्षांच्या या परियोजनेदरम्यान ती या गावातील कुपोषित गावकऱ्यांना अन्न-धान्य तसेच अन्य सुविधा देणार आहे. यासाठी जॅकलिनने आपल्या या पालघर प्रोजेक्ट्साठी 'अॅक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन'सोबत करार केला आहे. यााबाबत जॅकलिन म्हणाली, की कोरोना महामारीमध्ये असे काही तरी केले पाहिजे असा विचार माझ्या मनात आला आणि मी हा निर्णय घेतला. या दोन गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या परियोजनेविषयी बोलताना जॅकलिन म्हणाली की,* “या परियोजनेतून जवळपास 1,550 लोकांपर्यंत पोहोचता येणार असून गावकऱ्यांबरोबरच लहान मुलांचादेखील समावेश असेल. त्यांच्या कुपोषणाची तपासणी केली जाईल.

गणेशमुर्तींसाठी मुंबईत फिरते विसर्जन तलाव... पालिकेसह भाजप युवा मोर्चाचाही पुढाकार; वाचा सविस्तर

कुपोषणाविषयी जागरूकता सत्रदेखील आयोजित करण्यात येणार आहे. आम्ही 150 महिलांची नवजात बाळांची देखभाल करणे आणि त्यांना सक्षमबनविण्यासाठी जागरूकता करणार आहोत. कुपोषण दूर करण्याची साधनेही उपलब्ध करून देण्यात येतील आणि 20 महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत साह्य देण्यात येईल. समाजसेवा करणे मला आवडते आणि मला ही शिकवण माझ्या आई-वडिलांकडून मिळालेली आहे. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image