Star Pravah:सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत देवकीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

People are excited to see new devki from Star Pravah Serial Sukh Mhnje Nakki Kay ast

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत देवकीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री

सुख म्हणजे नक्की काय असतं ही प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेत सासू,सून,पती पत्नी या सगळ्या पात्रांनी ही मालिका प्रेक्षक आवडीने बघतात.सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेली आहे.(Marathi Serial)मालिकेतील शालिनीच्या डाव पेचांना उत्तर देत गौरी खंबीरपणे उभी रााहताना दिसते.शालिनीच्या प्रत्येक कृत्यात तीला साथ देणारी तीच्या जवळची मैत्रिण म्हणजे देवकी.देवकी शिवाय शालिनीला जणू काही जमायचं नाही.अशी देवकी म्हणजेच मीनाक्षी या मालिकेतून बाहेर पडली असून आता नवी देवकी कशी असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

या मालिकेतील याआधी देवकीचं लोकप्रिय पात्र करणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड ही खऱ्या आयुष्यात आई होणार असल्यामुळे तीने या मालिकेतून ब्रेक घेतलेला दिसते.त्यामुळे अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यापुढे देवकीचे पात्र साकारणार आहे.भक्तीला याआधी प्रेक्षकांनी अनेक मालिकांमधे पाहिले आहे.या मालिकेच्यी एन्ट्रीविषयी बोलताना भक्ती म्हणाली देवकी हे लोकप्रिय पात्र साकारण्याची संधी मला मिळतेय याचा मला आनंदच आहे पण आता या पात्रामुळे जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत.कारण मीनाक्षीच्या उत्तम अभिनयाला प्रेक्षकांची कायम पसंती होती.आता तीच पसंती भक्तीलादेखिल तीच्या अभिनयातून मिळवावी लागेल.त्यामुळे तीच्यासाठी देवकीचे पात्र आव्हानात्मक असणार आहे.

सेटवर आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि सर्वच कलाकारांची मला साथ लाभतेय.देवकीचे पात्र साकारणाऱ्या मीनाक्षीनेही भक्तीला व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या आहेत.त्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे.मी कोल्हापूरी लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय.प्रेक्षकांचं या मालिकेवर आणि देवकीच असंच अखंड प्रेम राहो हीच सदिच्छा.असे भक्ती म्हणाली.

देवकी या पात्रासाठी एन्ट्री करणारी भक्ती रत्नपारखी

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव मुख्य भूमिका साकारत आहेत.या मालिकेत अभिनेत्री वर्षा उजगावकरचीही महत्वाची भूमिका दिसून येते.

Web Title: Star Pravah Serial Serial Sukh Mhnje Nakki Kay Ast Devki Character Is Now Playing Bhakti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top