अस्तित्त्व टिकवण्यासाठी 'प्रवाह'ची नवी चाल; नायिकांचे केले मेकओव्हर

टीम ई सकाळ
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे  यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयार होते. या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलत नाही. मात्र, स्टार प्रवाहने एक वेगळा प्रयोग केला असून  सर्वच मालिकांच्या नायिका आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. फक्त नव्या रूपात नाही, तर त्यांचा मेकओव्हर झाला असून, या नायिका आता अधिकच ग्लॅमरस झाल्या आहेत. 

मुंबई : टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे  यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयार होते. या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलत नाही. मात्र, स्टार प्रवाहने एक वेगळा प्रयोग केला असून  सर्वच मालिकांच्या नायिका आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. फक्त नव्या रूपात नाही, तर त्यांचा मेकओव्हर झाला असून, या नायिका आता अधिकच ग्लॅमरस झाल्या आहेत. 
 
स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या मालिका सादर केल्या आहेत. या मालिकांतील व्यक्तिरेखा, विशेषतः नायिकांवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळेच नायिकांच्या दिसण्याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असतं. इतकंच नाही, फॅन्स नायिकांना सोशल मीडियावर फॉलोही करतात. त्यांच्या हेअरस्टाईल, कपडे, दागिने, त्यांचं स्टाईल स्टेटमेंट असं सारं काही... 'नकुशी' मधील नकुशी, 'गोठ' मधील राधा, 'दुहेरी' मधील सोनिया, 'लेक माझी लाडकी' मधल्या मीरा आणि सानिका आणि ‘कुलस्वामिनी’ मधील आरोही या व्यक्तिरेखांचा मेकओव्हर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा मेकओव्हर कथानकाची आणि त्यांच्या भूमिकांची गरज म्हणून करावा लागला आहे. या मेकओव्हरनं या सर्वच नायिका आता मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची दखल सोशल मिडियातून घेतली जात असून या नायिकांचे नवे रूप फेसबुक आणि व्हॉटसअप पोस्ट मधून व्हायरल होत आहे.
 
या सर्व नायिकांचा मेकओव्हर का झाला, कथानकामध्ये असं काय वळण आलं, की मेकओव्हर करावा लागला, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी स्टार प्रवाहवर न चुकता पहा नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी!

Web Title: Star prawah actress makeover esakal news