नेटका फॅमिली ड्रामा...!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

रंगशारदा ऋणानुबंध संस्थेच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी बाळ कोल्हटकर यांचं ‘वेगळं व्हायचंय मला’ हे नाटक त्यांनी रंगमंचावर आणलं तर गेल्या वर्षी शरद घाग लिखित ‘फुलाला सुगंध मातीचा’ नाटक साकारलं. अर्थात या दोन्ही प्रयोगांना येथील जाणकार रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कागल तालुक्‍यातील सेनापती कापशी गावची ही हौशी मंडळी. या परिसरात राजाभाऊ चिकोडीकर यांनी नाटकांची परंपरा रुजवली. पण, त्यांच्यानंतर ही परंपरा खंडित झाली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मात्र पुन्हा येथील रंगभूमीवर नव्याने काही प्रयोग सुरू झाले आणि ही मंडळी केवळ गाव आणि तालुक्‍यापुरतीच मर्यादित न राहता शहरात येऊन पदरमोड करून आपला कलाविष्कार रसिकांसमोर मांडू लागली. 

रंगशारदा ऋणानुबंध संस्थेच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी बाळ कोल्हटकर यांचं ‘वेगळं व्हायचंय मला’ हे नाटक त्यांनी रंगमंचावर आणलं तर गेल्या वर्षी शरद घाग लिखित ‘फुलाला सुगंध मातीचा’ नाटक साकारलं. अर्थात या दोन्ही प्रयोगांना येथील जाणकार रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेत हीच टीम १३४ वर्षांचा देदीप्यमान इतिहास असलेल्या राणी अहिल्याबाई वाचन मंदिर या संस्थेच्या बॅनरखाली स्पर्धेत सहभागी झाली. अर्थात वसंत कानेटकर लिखित ‘अखेरचा सवाल’ हा नेटका फॅमिली ड्रामा त्यांनी तितक्‍याच ताकदीने सादर केला. 

मुळात या टीमचा पहिल्यापासून एक प्रयत्न राहिला आहे तो म्हणजे जुन्या कलाकृती रंगमंचावर आणताना त्याचा ही मंडळी वर्तमानाशी संबंध जोडतात. विशेषतः बदलत चाललेल्या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती ही मंडळी रंगमंचावर आणतात. ‘अखेरचा सवाल’ साकारतानाही त्यामागची त्यांची प्रामाणिक भावना निश्‍चितच कौतुकास्पद. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर हे नाटक भाष्य करतं. मुळ तीन अंकी नाटक दोन अंकात सादर झालं. शिरोळसारख्या भागात कॅन्सर रूग्णांचे प्रमाण वाढत असताना हे नाटक या मंडळींना रंगमंचावर आणावं, असं वाटणं, हे ही नसे थोडके...! 

पात्र परिचय
मिलिंद चिकोडीकर (बॅरिस्टर), सायली कुलकर्णी-प्रभावळीकर (मुक्ताबाई), अवधूत आठवले (राजीव), कृतिका कापले-टेकाळे (नंदू), दीपाली शिंदे (हेमा), विजय मेस्त्री (डॉ. दुभाषी), धनाजी शिरगुप्पीकर (हरिभाऊ), प्रवीण पाटील (जयसिंह), यशवंत बुवा (प्रिन्सिपॉल), दशरथ टेकाळे (गंगाराम).

 दिग्दर्शक ः मिलिंद चिकोडीकर
 नेपथ्य ः गुरूप्रसाद जोशी
 रंगभूषा ः वैभवी बुवा
 वेशभूषा ः आनंद जाधव
 संगीत ः अभिजीत आठवले
 प्रकाश योजना ः श्रीराम चिकोडीकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state Drama competition