'स्टुडंट ऑफ द इयर 2'चे पोस्टर रिलीज; टायगर सोबत या दोन अभिनेत्री असतील स्टुडंट

Student of the year sequels poster release Tiger shrof Ananya pande Tara sutaria
Student of the year sequels poster release Tiger shrof Ananya pande Tara sutaria

मुंबई - बागी 2 सिनेमाच्या यशानंतर टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सज्ज झाला आहे तो 'स्टुडंट ऑफ द इयर 2' साठी. आलिया भट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा स्टारर सिनेमा 'स्टुडंट ऑफ द इयर'ने बॉक्स ऑफिसवर धुम केली होती. आता याच सिनेमाचा पार्ट 2 येणार आहे. पण सिनेमाची स्टार कास्ट मात्र बदलली आहे. सिनेमाचे शूटींग देहरादून मध्ये सुरु आहे. सिनेमाचे पहिले पोस्टर दिग्दर्शक करण जोहरने ट्विटरवरुन अपलोड केले आहे. यात टायगर श्रॉफ सोबत दोन लीड हिरोइन दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे. अनन्याचा हा डेब्यू सिनेमा आहे. तर दुसरी हिरोइन आहे टिव्ही कलाकार तारा सुतारिया. तारा ही अभिनयासोबतच डान्सर आणि गायिकाही आहे. तिने 'तारे जमीं पर' आणि 'गुजारिश' या सिमेमांसाठी गायले होते.   
 


'स्टुडंट ऑफ द इयर 2'ची शूटींग सध्या देहरादूनमध्ये होत आहे. या सिनेमाचे काही सीन्स मसूरी आणि ऋषिकेश येथेही शूट केले जातील. यानंतर पुढच्या शेड्यूलसाठी सिनेमाची टीम दिल्ली आणि पुण्यात येईल. 'स्टुडंट ऑफ द इयर' सारखेच त्याच्या सिक्वलमध्येही लव्ह ट्रँगल असेल. फक्त फरक एवढाच असेल की, पहिल्या सिनेमात दोन मुलांना एकच मुलगी आवडते आणि आता सिक्वल सिनेमात दोन मुलींना एकच मुलगा आवडेल. 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करत आहेत.
 


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com