Subhedar: रिलीज अवघ्या ३ दिवसांवर असताना सुभेदारची रिलीज डेट पुन्हा बदलली, आता या तारखेला होणार प्रदर्शित

सुभेदार सिनेमा १८ ऑगस्टला सगळीकडे रिलीज होणार होता पण आता...
subhedar marathi movie new release date is 25 august know the reason ajay purkar chinmay mandlekar
subhedar marathi movie new release date is 25 august know the reason ajay purkar chinmay mandlekar SAKAL

Subhedar Movie: सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्यावर आधारीत या सिनेमाची सुरुवातीपासुन चर्चा आहे. सुभेदार हा दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा आहे.

सुभेदार सिनेमा १८ ऑगस्टला सगळीकडे रिलीज होणार होता. सिनेमाचं रिलीज अवघ्या ३ दिवसांवर आलं असताना सुभेदार सिनेमाची रिलीज डेट पुन्हा बदलली आहे.

(subhedar marathi movie new release date)

subhedar marathi movie new release date is 25 august know the reason ajay purkar chinmay mandlekar
BB OTT 2 Elvish Yadav: तू ट्रॉफी आणि मन दोन्ही जिंकलंस भावा! एल्विशने विजयी झाल्यावर केलेल्या 'या' कृतीची सर्वांकडून वाहवा

सुभेदार सिनेमाची नवी रिलीज डेट

सुभेदार सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार होता. सिनेमाचं सध्या प्रमोशन जोरात सुरु आहे. पण रविवार रात्री अचानक सुभेदार सिनेमाच्या टीमने जाहीर केलं की, सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार नाही.

काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण अडचणींना न घाबरता आम्ही सिनेमा तुमच्या भेटीला आणणारच आहोत. त्यामुळे तांत्रिक अडचणींवर मात करुन आम्ही सिनेमा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.

अशाप्रकारे सुभेदार सिनेमा १८ ऑगस्ट नव्हे तर २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मरीन ड्राई्व्हवर सुभेदार सिनेमाचं भन्नाट प्रमोशन

सुभेदार चित्रपटाची टीम आज रविवारी सकाळी मरीन्स ड्राईव्हवर गेली होती. तिथे सुभेदार सिनेमाच्या टीमला भेटायला असंख्य फॅन्सनी गर्दी केली.

यावेळी चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र अशा सिनेमातील कलाकारांनी तरुणाईसोबत गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला.

या डान्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत चिन्मय मांडलेकर आणि सिनेमाचे इतर कलाकार भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सुद्धा सर्व टीमसोबत उपस्थित होते.

सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने केला वर्ल्ड रेकॉर्ड

सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने १ मिलीयन व्ह्युजचा टप्पा ओलांडला आहे. सुभेदारच्या ट्रेलरने अवघ्या २४ तासांमध्ये हा विक्रम केलाय. इतकंच नव्हे तर हा ट्रेलर ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

"'सुभेदार' लघुदर्शन (ट्रेलर) पोहोचला 1 Million व्हुजच्या पुढे... मन:पूर्वक आभार!!", अशी पोस्ट करत सिनेमाच्या टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com