Subhedar: शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी... शिवानीची सासुबाईंबद्दल खास पोस्ट

सुभेदार सिनेमाच्या निमित्ताने मृणाल - शिवानी ही सासू - सुनेची जोडी एकत्र काम करतेय
subhedar movie shivani rangole special post on mother in law mrinal kulkarni virajas kulkarni
subhedar movie shivani rangole special post on mother in law mrinal kulkarni virajas kulkarni SAKAL

Subhedar Movie News: सुभेदार सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. सुभेदार सिनेमा तीन दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारीत हा सिनेमा पाहण्याची उत्कंठा शिगेला आहे.

अशातच सुभेदार सिनेमानिमित्ताने एक विलक्षण योग जुळून आलाय. या सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही सासु - सुनेची जोडी एकत्र काम करतेय. याशिवाय मृणाल यांचा मुलगा आणि शिवानीचा नवरा विराजस सुद्धा या सिनेमात झळकत आहे.

(subhedar movie shivani rangole special post on mother in law mrinal kulkarni)

subhedar movie shivani rangole special post on mother in law mrinal kulkarni virajas kulkarni
Siddharth Chandekar: "आता मी तुझं लग्न लावतोय", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, अभिनेत्याचा आईला पाठिंबा

शिवानीची सासूबाईंसाठी खास पोस्ट चर्चेत

शिवानी रांगोळेने सुभेदार सेटवरील फोटो शेअर केलेत. या फोटोत मृणाल - शिवानी या सासु - सुनेच्या जोडीचं खास फोटोशूट पहायला मिळतं. याशिवाय हे फोटो पोस्ट करुन शिवानी लिहीते.

"समस्त शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी ताई आहे ह्याचा अभिमान आणि आनंद, सुभेदार चित्रपटात एकत्र काम करून द्विगुणित झाला! ह्या क्षणाबद्दल दिग्पाल लांजेकर खूप खूप धन्यवाद!!!"

सुभेदार सिनेमाचा नवीन रेकॉर्ड, ठरला पहिला मराठी सिनेमा

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. अशातच सिनेमाच्या टीमने सर्वांना आनंदाची बातमी दिलीय.

"प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट 'सुभेदार' !" हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय.

अशाप्रकारे ४० हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक आहेत. Book My Show वर असा रेकॉर्ड करणारा सुभेदार हा पहिलाच मराठी सिनेमा ठरलाय.

सुभेदार सिनेमा २५ ऑगस्टला भेटीला

सुभेदार सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार होता. सिनेमाचं सध्या प्रमोशन जोरात सुरु आहे. पण रविवार रात्री अचानक सुभेदार सिनेमाच्या टीमने जाहीर केलं की, सिनेमा १८ ऑगस्टला रिलीज होणार नाही.

काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण अडचणींना न घाबरता आम्ही सिनेमा तुमच्या भेटीला आणणारच आहोत. त्यामुळे तांत्रिक अडचणींवर मात करुन आम्ही सिनेमा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.

अशाप्रकारे सुभेदार सिनेमा १८ ऑगस्ट नव्हे तर २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com