esakal | सुबोध भावे आता नव्या रुपात? कोणती भूमिका साकारणार?
sakal

बोलून बातमी शोधा

सुबोध भावे आता नव्या रुपात? कोणती भूमिका साकारणार?

सुबोध भावे आता नव्या रुपात? कोणती भूमिका साकारणार?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो. आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चरित्र भूमिका साकारणारा एकमेव अभिनेता सुबोध याचे चरित्र अभिनेता असं समीकरण झालं आहे. सुबोधनं यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र भूमिका साकारल्या आहेत. आणि आता त्याच्या आगामी चित्रपटात तो पुन्हा चरित्र भूमिकेत चाहत्यांसमोर येणार आहे.

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात सुबोध छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनीच केलं आहे. त्यामध्ये सुबोध हा डॉ. घाणेकर यांच्या भूमिकेत होता. याच चित्रपटात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या दृश्यासाठी सुबोधनं छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारली होती आणि त्यासाठी त्याला चाहत्यांची दादही मिळाली होती.

प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. अभिजित आणि सुबोध ही जोडी नवी कलाकृती घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजले आहे. सुबोधने जवळपास ५० सिनेमे केले असून त्याने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये ही काम केले आहे. २०१५ मध्ये त्याने 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं.

हेही वाचा: साडी नेसल्याने मला 'संघी' म्हणणार का?: रवीना टंडन

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...

loading image
go to top