सुबोध भावेचा 'वर्तमान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सुबोध भावे, तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका
Subodh Bhave
Subodh Bhave

'वर्तमान' Vartaman या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे Subodh Bhave मुख्य भूमिका साकारत आहे. पोस्टरमध्ये सुबोधच्या पाठीमागे वर्तमान पत्रातील बातम्या दिसत असून बाजूला पेन दिसत आहे. या पोस्टरवरून लक्षात येते की पत्रकार आणि पत्रकारिता यावर थेट भाष्य करणारा हा चित्रपट आहे. (subodh bhave starrer vartaman movie poster released)

हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सुबोध भावेसोबतच मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल, तेजस्विनी पंडित, संजय मोहिते अशा अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे.

Subodh Bhave
सोनाली कुलकर्णीचा पती आहे तरी कोण?

या चित्रपटाचे छायाचित्रण नंदकुमार पाटील, संकलन संतोष जीवनजीकर, कला दत्ता लोंढे, नृत्य फुलवा खामकर, वेशभूषा सपना बन्सल तर चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर, गीतकार, इलाही जमादार, संगीत हर्षित अभिराज तर चित्रपट लेखन संजय पवार यांनी केले आहे. मराठीतील मल्टिस्टारर आणि दर्जात्मक कथानक असलेला हा चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वास चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com