
कॉमेडियन सुगंधा मिश्रा-संकेत भोसले अडकले लग्नबंधनात
'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे कलाकार सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सुगंधा आणि संकेतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसंपूर्वी संकेत आणि सुगंधाने रोमँटिक फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. यावेळी सुगंधाने या फोटोला कॅप्शन दिले होते, 'आम्हा दोघांवर इतकं प्रेम करण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. २६-४-२०२१'
सोमवारी 26 एप्रिलला संकेत आणि सुगंधाचा लग्नसोहळा जालंधरच्या कबाना क्लबमध्ये पार पडला. कोरोनामुळे फक्त २० जणांनीच लग्नसोहळ्याला हजेरी लावली. सकाळी साखरपुडा दुपारी सप्तपदी आणि संध्याकाळी वरात असे एकाच दिवशी सर्व लग्नविधी पार पडले. मेहंदी सोहळा लग्नाच्या दोन दिवसआधी सुगंधाच्या निवासस्थानी पार पडला. लग्नाच्या एक दिवस आधी संकेत आणि त्याचा परिवार जालंधरला पोहोचले. सोमवारी सकाळी मुहूर्ताच्या दोन तास आधी महाराष्ट्रीयन पध्दतीने हळदीचा समारंभ पार पडला. त्यानंतर लग्नसोहळा पार पडला. रात्री 3 वाजता सप्तपदीचे विधी पार पडले. कोव्हिडच्या सर्व नियमांचे पालन करून संकेत आणि सुगंधाचा विवाहसोहळा पार पडला.
हेही वाचा : रुचा आपटेने 'मुळशी पॅटर्न'मधील अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ
सुगंधा आणि संकेत २०१६ पासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यावेळी सुगंधाने त्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असं ती म्हणाली होती. या चर्चांनंतर सुगंधा आणि संकेतने झी टीव्हीवरील 'समर एक्स्प्रेस' या कार्यक्रमाचं एकत्र सूत्रसंचालन केलं होतं. संकेतने 'द कपिल शर्मा शो'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारली होती. तर सुगंधाने या शोमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. संकेतचा 'बाबा की चौकी' हा शोसुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे.
Web Title: Sugandha Mishra Got Married With Comedian Sanket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..