
'वाय' चित्रपटाला खासदार सुजय विखेंचा पाठिंबा.. सत्य घटनांवर आधारित आहे 'Y'
Marathi movie : गेली काही दिवस आपल्याकडे 'वाय' (Y) चित्रपाटाची भलतीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक अद्याप समोर आले नसले तरी हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे (mukta barve) प्रमुख भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून अनेक कलाकार, प्रेक्षक आणि अनेक मान्यवर मंडळी हातामध्ये 'वाय' अक्षर लिहीलेले पोस्टर घेऊन चित्रपटाला पाठिंबा देत आहेत.
(sujay vikhe patil shared 'Y' film poster and support mukta barve)
हेही वाचा: अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार
अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. अनेक कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर हा फोटो शेअर करताना दिसत आहे. नुकतंच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनीही सोशल मीडियावर ‘वाय’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याद्वारे त्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. (sujay vikhe patil)
भाजप खासदार सुजय विखे पाटील हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर इंग्रजीतील Y अक्षर लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे अनेकांना ‘वाय’ नक्की आहे तरी काय याची उत्कंठा लागून राहिली आहे.
Web Title: Sujay Vikhe Patil Shared Y Film Poster And Support Mukta Barve
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..