
अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार
Pushkar jog mother : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग यांची आई तसेच 'जोग एज्युकेशन ट्रस्ट'च्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'जोग एज्युकेशन'च्या अकरा शाळांसाठी (schools) शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून स्व-मान्यता (बनावट) प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी हा (surekha jog) गुन्हा दाखल झाला आहे. (pune latest marathi news) (educational crime)
हेही वाचा: अभिनेता सुमीत राघवनने केलं 'योगी आदित्यनाथ' यांचं कौतुक, कारणही आहे तसंच..
या प्रकरणी सुरेखा जोग यांच्यासह पुणे (pune) जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात (bundgarden police station) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ११ बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. (crime filed on marathi actor pushkar jog's mother surekha jog for education curruption)
हेही वाचा: करण जोहरचा पन्नासावा वाढदिवस, 'हे' आहेत त्याचे धक्कादायक महागडे शौक...
एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या 11 शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी जोग एज्युकेशन ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली आहेत. तसेच या अकरा शाळांच्या मुख्याध्यापकाद्वारे 25% मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण विभागातील अधिकारी किसन दतोबा भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग तसेच गौतम शंकर शडगे, किशोर पवार, हेमंत सावळकर यांच्या विरोधात भादवी 420, 464, 465, 466, 468, 470, 471,201, आणि 120 ब 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींना सध्या अटक करण्यात आली नसून बंडगार्डन पोलिस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे
Web Title: Crime Filed On Marathi Actor Pushkar Jogs Mother Surekha Jog For Education Corruption
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..