
आज तू सातासमुद्रापार गेलीस... लेकीच्या वाढदिवसाला Sukanya Mone झाल्या भावूक
Sukanya Mone - Sanjay Mone Daughter: मुलांचा वाढदिवस असल्यावर प्रत्येक आई वडिलांसाठी खास दिवस असतो. पण वाढदिवसाला मुलगा जर आपल्यापासून दूर असेल तर आई बाबांना थोडं वाईट हे वाटतंच.
असंच काहीसं भावूक क्षण अभिनेत्री सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या वाट्याला आलाय. आज संजय आणि सुकन्या यांची लेक ज्युलियाचा वाढदिवस आहे.
(sukanya mone emotional birthday post for her daughter julia mone)
प्रसिद्ध अभिनेत्री संजय मोने आणि सुकन्या मोने यांची लेक ज्युलियाचा आज वाढदिवस आहे. ज्युलिया २१ वर्षांची झाली आहे.
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुकन्या मोने लिहितात.. Happy birthday dear Julia आज तू सातासमुद्रापार तुझा २१ वा वाढदिवस साजरा करतेय आहेस....
आनंद ह्याचा आहे की तू तिकडे जाऊनही तुझं विश्व,तुझे मित्र मैत्रिणी संग्रही केलेस आणि त्यांच्याबरोबर आजचा दिवस साजरा करते आहेस.खूप खूप शुभेच्छा आणि तुला खूप यश मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना!
सुकन्या यांनी लिहिलेल्या पोस्ट्स नुसार ज्युलिया तिच्या वाढदिवसाला भारतात नसून ती परदेशात गेली आहे.
ज्युलिया परदेशात शिकायला गेली आहे की काही वेगळ्या कारणांसाठी गेली आहे याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. आई बाबांप्रमाणे ज्युलिया सुद्धा मनोरंजन विश्वात पदार्पण करणार का हे काहीच दिवसांमध्ये कळेल.
सुकन्या मोने या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी आमिर खान सोबत सरफरोश या हिंदी सिनेमात अभिनय केलाय.
सुकन्या मोने यांना आपण आभाळमाया, जुळून येती रेशीमगाठी, चूकभूल द्यावी घ्यावी, शुभमंगल ऑनलाईन अशा मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सुकन्या सध्या झी मराठीवरील अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत अभिनय करत आहेत.
तर सुकन्या यांचे पती आणि सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने हे सुद्धा गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात काम करत आहेत.
संजय मोने यांना आपण प्रपंच, खुलता कळी खुलेना, तुमची मुलगा काय करते अशा मालिकांमध्ये अभिनय करताय पाहिलंय. सुकन्या आणि संजय लेकीच्या करियरला कायम सपोर्ट करताना दिसतात.
सुकन्या आणि संजय यांची लेक ज्युलियाला अभिनय करताना पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.