तो माझा खूप चांगला मित्र.. Laxmikant Berde ची आठवण शेयर करताना Anil Kapoor झाले भावुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laxmikant berde, anil kapoor, hamal de dhamal

तो माझा खूप चांगला मित्र.. Laxmikant Berde ची आठवण शेयर करताना Anil Kapoor झाले भावुक

Anil Kapoor and Laxmikant Berde News: लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आजही प्रत्येक भारतीयाला आणि विशेष करून मराठी माणसाला येत असते. लक्ष्याने एका पिढीला खळखळून हसवलं आहे. कधी गंभीर भूमिका करून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

लक्ष्याचा निरागस अभिनय आणि विनोदाचा अचूक टायमिंग पाहणं हि पर्वणी असते. लक्ष्याची आठवण बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर यांनी काढली आहे. निमित्त होतं मराठी भाषा दिवस..

(Anil Kapoor got emotional while sharing the memory of Laxmikant Berde)

अनिल कपूर यांनी आजवर मराठीत फक्त एकाच सिनेमात अभिनय केलाय तो म्हणजे हमाल दे धमाल. काल झालेल्या मराठी भाषा दिनानिमित्ताने अनिल कपूर यांनी लक्ष्या सोबतचा फोटो पोस्ट करून त्याच्याविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे.

अनिल कपूर यांनी त्यांच्या मित्राची म्हणेजच लक्ष्याची आठवण जागवली आहेच शिवाय मराठी भाषा दिनाविषयी सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

अनिल कपूर फोटो पोस्ट करून लिहीतात.... महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने मला एक आठवण आलीय ती म्हणजे 'हमाल दे धमाल' हा माझा आजवरचा पहिलाच मराठी पिक्चर.

माझं सौभाग्य आहे की मला या सिनेमात काम करायला मिळालं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा त्याच्या कारकीर्दीतला बेस्ट परफॉर्मन्स पाहता आला. माझा मित्र लक्ष्मीकांत.. मला त्याची रोज आठवण येते.

अनिल कपूर यांनी शेयर केलेली पोस्ट लक्ष्याची मुलं म्हणजेच अभिनेता अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांनी शेयर केली आहे. त्यांना खूप आनंद झाला असून त्यांनी अनिल कपूर यांचे आभार मानले आहेत.

या पोस्टवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे.. अनिल कपूर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे खूप चांगले संबंध होते. दोघांनी एकत्र असं कमी काम केलं असलं तरीही दोघांची मैत्री खूप खास होती.

अनिल सध्या हॉटस्टार वरील द नाईट मॅनेजरच्या भारतीय रूपांतरामध्ये रोपरच्या भूमिकेत दिसत आहे. या सिरीजमध्ये आदित्य रॉय कपूर पाइनच्या भूमिकेत दिसत आहे.

शोमध्ये शोभिता धुलिपाला देखील प्रमुख भूमिकेत आहे. द नाईट मॅनेजर या वेबसिरीजला अल्पावधीतच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली आहे.