Sulochana Latkar Death : सात्विक चेहऱ्याच्या, प्रसन्न मुद्रेच्या दीदी काळाच्या पडद्याआड!

सुलोचना दीदी या गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजारानं त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Sulochana Latkar Death
Sulochana Latkar Deathesakal
Updated on

Sulochana Latkar Marathi Actress Death age 94: भूमिका कोणतीही का असेना आपण ती समरसून करणे हा सुलोचन दीदींच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता. मराठी चित्रपट विश्वात आपल्या हावभावानं, आणि सोज्ज्वळ अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून दीदींचे नाव नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहणार आहे.

दीदींचे बोलणे, त्यांचा अभिनय हे सारं वेगळ्याच धाटणीचे होते. त्यात एक प्रकारचा गोडवा होता. म्हणून की काय त्यांच्या वाट्याला आलेल्या आईच्या भूमिका त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्या. Sulochana Latkar Marathi Actress Death age 94 life story inspirational

सुलोचना दीदी या गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजारानं त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दीदींच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर विविध कलाकारांनी दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी दीदींसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

Sulochana Latkar Death
Sulochana Latakar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

दीदींचा जन्म हा ३० जुलै रोजी १९२८ मध्ये कोल्हापूर जवळील खडकलाट गावी झाला. सुलोचना यांचे पूर्ण नाव सुलोचना लाटकर. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे.

Sulochana Latkar Death
Sulochana Didi Passed Away : 'मराठी चित्रपटसृष्टीची आई गेली'! उषा नाडकर्णी भावूक

भालजी पेंढारकर यांने त्यांचे भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण ‘सुलोचना’ असे केले. हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. अडीचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या सुलोचना यांना चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने बनूबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सुलोचना यांनी १९४३ मध्ये मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’च्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले.

दीदींनी चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात भरपूर वाचन करून, संस्कृत श्लोक पठण करून त्यांनी शुद्ध मराठी नागरी भाषा आत्मसात केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.

१९४३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या सुलोचना यांनी कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केले आहे. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ यांसह अनेक मानसन्मान मिळालेल्या सुलोचना यांना भारत सरकारने १९९९मध्ये ‘पद्मश्री’ किताबानेही गौरविले. त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकीर्दीविषयी लेखक-पत्रकार इसाक मुजावर यांनी ‘चित्रमाऊली’ हे पुस्तक लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com