सुनील शेट्टीचा कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

कोकणला पावसानं झोडपून काढलं आहे.
Suniel Shetty
Suniel Shettyfile photo

काही दिवसांपूर्वी कोकणासहीत Kokan महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, महाड, या ठिकाणी घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. राज्यभरातून कोकणवासीयांना सावरण्यासाठी पूरग्रस्त भागात मदत पोहोचवली जात आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने Suniel Shetty फेसबुकवर महाराष्ट्राला आपली गरज आहे, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे. 'सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' या सामाजिक संस्थेसोबत मिळून कोकणासाठी मदत करणार असल्याची माहिती त्यांने या माध्यमातून दिली आहे.

कोकणात अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. रायगड आणि रत्नागिरीमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण कोकणवासियांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, अशी भावना सुनील शेट्टीने व्यक्त केली आहे. सुनील शेट्टीने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल 'सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' संस्थेच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी देखील आभार व्यक्त केले आहे. आज अस्मानी संकटामुळे कोकणवासी हतबल झाले असून त्यांचा उध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेणं गरजेचं आहे, असं मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केलं.

Suniel Shetty
'आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही', भरत जाधवचं मदतीचं आवाहन

मनसेनं बॉलवूड कलाकारांवर व्यक्त केला होता संताप

'इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरू केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो,' असं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com