Suniel Shetty Interview : 'आमच्यासाठी नारळाचं झाडं म्हणजे गोमाता'! बॉलीवूडचा अण्णा बोलला

आता सुनील शेट्टी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.
Suniel Shetty Interview
Suniel Shetty Interview
Updated on: 

Suniel Shetty reveals all in the Rapid Fire round : बॉलीवूडचा अण्णा म्हणून ज्याच्याकडे मोठ्या अभिमानानं पाहिले जाते त्या सुनील शेट्टीची गोष्टच वेगळी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुनील शेट्टीनं त्याच्या अभिनयानं आणि हटक्या स्टाईलनं प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. आपल्या परखड वक्तव्याबद्दलही तो बऱ्याचदा ओळखला गेला आहे.

आता सुनील शेट्टी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. एएनआयनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये अण्णानं मुलाखतीमध्ये नारळाचं झाड आणि गोमाता यांच्याविषयी वेगळी मांडणी केली आहे. जी चर्चेत आहे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावर बाकीच्या नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

स्मिताज् पॉडकास्ट मध्ये सुनील शेट्टीला रॅपिड फायरमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यातून त्यावेळई सुनील शेट्टीनं वेगवेगळ्या प्रश्नानं तितक्याच प्रभावीपणे उत्तरं दिली आहेत. आपल्या आवडत्या पदार्थांविषयी, ठिकाणांबाबत त्यानं सांगितलं आहे. अशात त्याला नारळाचं झाड याविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, साऊथची लोकं नारळाच्या झाडाला गोमाता असे म्हणतात.

नारळाच्या झाडाशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही उपयोगात आणली जाते. त्याच्या फांद्या, नारळ, नारळाची करवंटी, नारळाचे पाणी, खोबरे, नारळाच्या शेंड्या यापासून विविध उपयोगी वस्तू तयार करता येतात. म्हणून साऊथमध्ये गायीप्रमाणेच नारळाच्या झाडाची पूजा केली जाते. असे अण्णानं त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टींनं त्याच्या जावयाला केएल राहुलला ट्रोल करणाऱ्यांवर आगपाखड केली होती. तुम्ही कोणत्याही कारणावरुन सेलिब्रेटींना ट्रोल करता, असे कृपया करुन करु नका. त्याचा आम्हा सगळ्यांवर होणाऱ्या परिणामाचा थोडा का होईना विचार करा. असे सुनील शेट्टीनं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
Pune Bangalore Highway Traffic Diversion
Sugarcane farmers spend the night on the roadside during the ongoing price protest at Kini.
Highway to be blocked at Kini and Nagthane on November 3