
सुनील ग्रोवरने नुकतंच 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' शो मध्ये गोपी बहु या प्रसिद्ध भूमिकेला रिक्रिएट केलंय. या सीनमध्ये सुनील ग्रोवर टोपी बहुच्या भूमिकेत आहे आणि त्याने केलेला अभिनय सगळ्यांना वेड लावतोय.
मुंबई- सुनील ग्रोवरला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की प्रेक्षकांच मनोरंजन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं. सुनील ग्रोवरने नुकतंच 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' शो मध्ये गोपी बहु या प्रसिद्ध भूमिकेला रिक्रिएट केलंय. या सीनमध्ये सुनील ग्रोवर टोपी बहुच्या भूमिकेत आहे आणि त्याने केलेला अभिनय सगळ्यांना वेड लावतोय.
हे ही वाचा: 'स्लिम दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्स, मलाही हाच सल्ला दिला होता' राखी सावंत बरळली
कॉमेडिअन सुनील ग्रोवरने 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' या शोमधील एका सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो गोपी बहुची रिक्रिएट केलेली भूमिका टोपी बहु साकारतोय. टोपी बहु तिच्या पतीसाठी जेवणाचा डब्बा घेऊन येते. टोपी बहुचा पती तिची स्तुती करतो आणि म्हणतो चला आज मी १० पोळ्या खाणार आहे. हे ऐकून टोपी बहु हैराण होते. टोपी बहुने घाईघाईत एकच पोळी डब्ब्यात आणलेली असते. त्यानंतर टोपी बहु पतीला झेरॉक्स मशीन विषयी विचारते.
या मशीन विषयी सांगताना तो म्हणतो की यात कोणतीही गोष्ट टाकली की तिच्या हव्या तेवढ्या कॉपीज निघतात. ही झेरॉक्स मशीन पाहून तिला आयडिया सूचते आणि मग काय होत यासाठी तुम्ही हा मजेदार व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ शेअर करताना सुनीलने लिहिलंय, 'टोपी बहु करे तो क्या..'
'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' एक नवीन कॉमेडी शो आहे. ज्यामध्ये मालिकेतील, सिनेमातील मजेशीर पात्र असतात. या शोमध्ये सुगंधा मिश्रा, संकेत भोसले, पारितोष त्रिपाठी, उपासना सिंह, जतिन्दर सुरी आणि सिद्धार्थ सागर या कलाकारांचा समावेश आहे.
sunil grover aka topi bahu hilarious video from comedy show gangs of filmistan