सुनील शेट्टीचा 'ॲप'लेपणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सुनील शेट्टी आपल्याला ॲक्‍शनसाठी परिचित आहे. बराच काळ तो सिनेमापासून लांब राहिला आहे, पण तो आता परत येतोय. पडद्यावर काम करण्यासाठी नाही तर एक नवीन ॲप घेऊन. ‘एफ द काऊच’ असं या ॲपचं नाव आहे. आजच्या तरुणाईला मनोरंजन क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. खूप स्ट्रगल केल्यावर त्यांना या क्षेत्रातील संधीची दारं खुली होतात. त्यांच्यासाठी हे ॲप फायदेशीर ठरणार आहे. या ॲपबद्दल सुनील शेट्टी म्हणाला, ‘मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात न्यू टॅलेंटची गरज आहे, पण याची माहिती फारच कमी जणांना असते.

सुनील शेट्टी आपल्याला ॲक्‍शनसाठी परिचित आहे. बराच काळ तो सिनेमापासून लांब राहिला आहे, पण तो आता परत येतोय. पडद्यावर काम करण्यासाठी नाही तर एक नवीन ॲप घेऊन. ‘एफ द काऊच’ असं या ॲपचं नाव आहे. आजच्या तरुणाईला मनोरंजन क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. खूप स्ट्रगल केल्यावर त्यांना या क्षेत्रातील संधीची दारं खुली होतात. त्यांच्यासाठी हे ॲप फायदेशीर ठरणार आहे. या ॲपबद्दल सुनील शेट्टी म्हणाला, ‘मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात न्यू टॅलेंटची गरज आहे, पण याची माहिती फारच कमी जणांना असते. या ॲपवर मुलं त्यांना काय येतं किंवा त्यांच्याकडे कुठली कला आहे, याबद्दलचे व्हिडीओ किंवा ऑडिओ टाकू शकतात.

बीपीओमध्ये जशी बॅक ऑफिसला टीम असते, त्याच प्रकारची टीम निवडून मुलांनी टाकलेल्या या पोस्टचा दर्जा ठरवला जाणार आहे. त्यानंतर इंडस्ट्रीत जॉब निर्माण झाला की या मुलांशी संपर्क साधून त्यांना काम देण्यात येणार आहे. या मुलांचं सिलेक्‍शन प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्‍टर मुकेश छाब्रा करणार आहेत. ‘इंडस्ट्रीत निर्माण होणाऱ्या नव्या संधी आणि  विविध जॉब इथे उपलब्ध असणार आहेत. मग ते असिस्टंट डिरेक्‍टर असो, लेखक असो, डीजे असो किंवा म्युझिक डिरेक्‍टर असो. तुमच्यात ती कला असेल तर तुम्हाला नक्कीच या संधीचा लाभ घेता येईल. नुकतंच ॲपचं लाँचिंग झालं. त्याचबरोबर आणखी एक खूशखबर म्हणजे सुनील शेट्टी या ॲपला सपोर्ट करण्यासाठी लवकरच नवीन चॅनेलचीदेखील घोषणा करणार आहे. हा चॅनेल काही तरी धमाकेदार घेऊन येणार, असं सुनील शेट्टीने सांगितलं.

Web Title: sunil shetty action