
जावईबापु खुश! राहुल -अथियाच्या लग्नावर सासरेबुवा बोलले...
Suniel Shetty on daughter Athiya-KL Rahul wedding date: बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या गेलेल्या सुनील शेट्टीची मुलगी अथिया ही भारतीय (Entertainment News) क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज के एल राहुलच्या प्रेमात (K L Rahul) पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. चाहत्यांनी (Athiya Shetty) देखील या दोन्ही सेलिब्रेटींना आता लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. यासगळ्य़ात राहुलचे होणारे सासरेबुवा सुनील शेट्टींनी दिलेली प्रतिक्रिया (Bollywood News) चर्चेत आली आहे. ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत.
अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यावर सुनील शेट्टींनी केलेली कमेंट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यांनीच सांगितलं आहे की, राहुल अथियाचे लग्न केव्हा होणार आहे ते....यापूर्वी अथियाच्या भावानं अहान शेट्टीनं देखील आपल्या बहिणाच्या लग्नासंबंधी पोस्ट केली होती. चाहत्यांमध्ये अशी चर्चा आहे की यावर्षी डिसेंबरमध्ये राहुल लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्यांचे लग्न हे दाक्षिणात्य पद्धतीनंच होणार आहे. कारण राहुल आणि अथिया हे बंगलोर येथे राहणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुनील शेट्टीची टीम वेगवेगळ्या शहरांमधील हॉटेल्स आणि त्याची माहिती जमवत आहेत. त्यानंतर राहुलनं एक नवे घर घेतले आहे. त्यामध्ये ते लग्नानंतर शिफ्ट होणार आहे. दुसरीकडे अथियानं देखील आपण नव्या घरात आपल्या कुटूंबासमवेत शिफ्ट होणार असल्याचे सांगितले आहे. सुनील शेट्टीनं यासगळ्या प्रकरणावर सांगितलं आहे की, मला काय वाटतं यापेक्षा मुलांना काय वाटतं हे जास्त महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचे आहे. मला वाटतं माझी मुलगी जेवढी लवकर लग्न करेल तेवढं चांगलं. थोडक्यात सासरे बुवांकडून जावई बापुंना गोड बातमी मिळाली आहे. अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे.
हेही वाचा: सुनील शेट्टीची लेक आणि K Lराहुल Live In मध्ये?
शेट्टीनं यावेळी जावयावर आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, मला राहुल आवडतो. तो एक चांगला मुलगा आहे. माझंही त्याच्यावर प्रेम आहे. त्याला काय वाटतं हे जास्त महत्वाचे आहे. मी कोणत्याही प्रकारचा दबाव त्याच्यावर टाकत नाही. त्यांना काय वाटते हे माझ्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचे सुनील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: 'मास्टरशेफ' अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल! - Video Viral
Web Title: Sunil Shetty Comment On Athiya K L Rahul Wedding Viral Social Media I Love Rahul
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..