सनी दाचा जीव रंगला 'या' व्यक्तीमध्ये, बांधली आयुष्याची गाठ

वृत्तसंस्था
शनिवार, 14 डिसेंबर 2019

मी वेळातच 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने लोकांच्या मनात घरात केले. मालिकेतला राणा दाचा मोठा भाऊ सनी दाचीही तेवढीच क्रेझ पाहायला मिळाली. सनी दाचं म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका लोकांच्या पसंतीच्या आहेत. मात्र कमी वेळातच 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने लोकांच्या मनात घरात केले. राणा दा आणि अंजली बाईंच्या जोडीला अख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण मालिकेतला राणा दाचा मोठा भाऊ सनी दाचीही तेवढीच क्रेझ पाहायला मिळाली. सनी दाचं म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

राजचा जीव एका हरियाणाच्या मुलीवर जडला आणि त्या दोघांनी लग्न केलं आहे. मनीषा उर्फ मॉली डेस्वाल हिच्यासोबत राजचा विवाह झाला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Grow old along with me! The best is yet to be. #RajKiMolly #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love #friends

A post shared by Raaj (@raj_hanchanale) on

नेटकऱ्यांनी त्यांच्या सुंदर फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सेलिब्रिटींनी य़ा जोडप्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.  हे कपल खऱ्या अर्थाने 'कपल गोल्स' आहेत असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#rajkimolly #destinationwedding #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love

A post shared by Raaj (@raj_hanchanale) on

राज हा मुळचा कोल्हापुरचा आहे. तर, मॉली हरियाणाची आहे. राज आणि मॉली एकमेकांना गेल्या सहा वर्षापासून ओळखत आहेत. राज आणि मॉलीचं लव्हमॅरेज आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#rajkimolly

A post shared by Molly Deswal (@happpy__molly) on

मालिकेमध्ये आपल्या भावाला जीव लावणारा, अंजली वहिनींचा आदर करणारा सुरज म्हणजेच सनी दा. कधी घरामध्ये दारु पिऊन दंगा करणारा पण कधी राणा दा आणि वहिनींच्या बाजूने उभा राहणारा सुरज प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunny da from tuzyat jiv rangla serial got hitched to this girl