Sunny Deol : सनी देओल हरवलाय, कुणाला सापडलाय? मतदार संघात अजब पोस्टरबाजी, चक्क ५० हजारांचं इनाम!

गदर २ मधून बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन करणाऱ्या सनी देओलची गोष्टच वेगळी आहे.
Sunny Deol BJP MP Missing Posters in Pathankot viral
Sunny Deol BJP MP Missing Posters in Pathankot viralesakal

Sunny Deol BJP MP Missing Posters in Pathankot viral :

गदर २ मधून बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन करणाऱ्या सनी देओलची गोष्टच वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी तो रस्त्यावर दारु पिऊन झिंगलेल्या अवस्थेत दिसत होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर काही वेळानं चित्रपटाच्या एका सीनचे ते चित्रिकरण होते असे त्यानं सांगून त्यावर पडदाही टाकला होता.

आता सनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरील त्या फोटोमुळे व्हायरल झाल आहे. सनी हा गुरुदासपूर मतदार संघाचा खासदार आहे. बॉलीवूडमध्ये सनीच्या नावाची जेवढी चर्चा आहे किंवा तो जितका लोकप्रिय आहे तेवढा तो त्याच्या मतदार संघामध्ये मात्र नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. निवडणूक झाल्यापासून तो त्याच्या मतदार संघामध्ये फिरकला नसल्याचे त्याच्या मतदारांचे म्हणणे आहे.

Sunny Deol BJP MP Missing Posters in Pathankot viral
Sunny Deol BJP MP Missing Posters in Pathankot viraleSakal

आमचे खासदार हरवले आहेत. त्यांना सापडून देणाऱ्यांना ५० हजारांचे बक्षीसही लोकांनी जाहीर केले आहे. त्या फोटोंवर इतर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत. तो जेव्हापासून खासदार झाला तेव्हापासून मतदार संघात फिरकलाच नाही असे त्याच्या मतदारांचे म्हणणे आहे. त्यानं कोणतीही विकासकामं केलेली नाहीत. असाही आरोप त्यांनी केला आहे.

सनीवर अशाप्रकारची टीका ही काही पहिल्यांदाच झालेली नाही. यापूर्वी देखील त्याच्यावर अशा प्रकारे मतदारांनी हल्लाबोल केला आहे. मात्र त्याचा अभिनेत्यावर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यामुळेच की काय त्यानं पुन्हा एकदा आपल्या मतदार संघाकडे कानाडोळा केला आहे.

सनी हा गुरदासपूर-पठाणकोट मतदार संघाचा भाजपचा खासदार आहे. गुरदासपूरमधील एका बस स्टँडवर सनी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. पठाणकोट जिल्ह्यामध्ये यापूर्वी देखील सनीची अशा प्रकारे पोस्टरबाजी झाल्याचे दिसून आले आहे. सुजानपूरमध्ये देखील असे बॅनर लागले होते.

अनेकदा सनीला निरोप देऊनही त्यानं मतदार संघाकडे पाहिलेलं नाही. अशाप्रकारे पोस्टरबाजी करुन त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. चिडलेल्या मतदारांनी केवळ बस स्टँडवरच पोस्टरबाजी केलेली नाही तर बस मधील प्रवाशांना देखील ते पोस्टर वाटप केले आहे.

Sunny Deol BJP MP Missing Posters in Pathankot viral
Sunny Deol: मद्यधुंद अवस्थेतील 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओलची प्रतिक्रिया, म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com