Sunny Deol dance : भावाच्या गाण्यावर सनी नाचला, 'जमाल कुडू' वर तारा सिंगचा डान्स एकदा पाहाच!

सनी देओल हा त्याच्या आगळ्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.
Sunny Deol Bollywood Actor Bobby Deol Jamal Kudu song
Sunny Deol Bollywood Actor Bobby Deol Jamal Kudu songesakal

Sunny Deol Bollywood Actor Bobby Deol Jamal Kudu song : सनी देओल हा त्याच्या आगळ्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. यंदाच्या वर्षी त्याचा गदर २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं हजार कोटींची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यानंतर आता सनी देओल आणखी एका वेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे सनीचा भाऊ बॉबी देओल हा अॅनिमल नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्यातील त्यानं जो खलनायक साकारला आहे त्याचे कौतुक होत आहे. त्यापेक्षाही त्यानं जमाल कुडू नावाच्या गाण्यावर जो डान्स केला आहे त्यामुळे बॉबी कमालीचा लोकप्रिय झाला आहे. खरं तर जमाल कुडू नावाचे हे गाणे जुनेच आहे. मात्र अॅनिमलमधून ते पुन्हा प्रकाशझोतात आले.

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे या गाण्याचे रिल्स आहेत. व्हिडिओ समोर येत असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. बॉबीच्या करिअऱमध्ये अॅनिमलनं मोठी भूमिका बजावली आहे. त्याचं जोरदार कौतुकही होत आहे. त्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. अशातच सनीनं देखील आपल्या भावाच्या त्या गाण्यावर डान्स केला आहे. तो लोकप्रिय होताना दिसत आहे.

ख्रिसमसच्या निमित्तानं व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात सनीनं केलेला डान्स हा चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील सनीचा एक गमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो फुल्ल टल्ली झाल्याचा व्हिडिओ होता. त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते.

अखेर त्या व्हिडिओवरुन सनीनं स्पष्टीकरण दिले होते. त्यानं आपल्या एका चित्रपटाचे शुटींग सुरु होते. त्यातील मद्यपी व्यक्तिची भूमिका करताना आपल्याला तो तसा अभिनय करावा. असे सनीनं म्हटले होते. दरम्यान सनीच्या त्या व्हायरल व्हिडिओला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता त्या जमाल कुडू नावाच्या गाण्यावर केलेल्या डान्सनं चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com