esakal | मुंबईत सनीने विकत घेतलेल्या 5BHK फ्लॅटची किंमत ऐकून विस्फारतील डोळे!
sakal

बोलून बातमी शोधा

sunny leone

अंधेरी पश्चिम भागातील 'अटलांटिस' या इमारतीत १२व्या मजल्यावर सनीने विकत घेतलं घर

मुंबईत सनीने विकत घेतलेल्या 5BHK फ्लॅटची किंमत ऐकून विस्फारतील डोळे!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईतील अंधेरी या भागात नवीन घर विकत घेतलं आहे. २८ मार्च रोजी तिने घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली. अंधेरी पश्चिम भागातील 'अटलांटिस' या इमारतीत १२व्या मजल्यावर सनीने घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत तब्बल १६ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. सनीच्या या नवीन घराची जागा ३,९६७ स्क्वेअर फूट इतकी असून हे पाच बीएचके घर आहे. घरासोबतच पार्किंगसाठी तीन जागाही मिळाल्या आहेत. Zapkey.com ने दिलेल्या वृत्तानुसार, सनीने स्टँप ड्युटीसाठी ४८ लाख रुपये भरले आहेत. 'मनी कंट्रोल' या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, 'या अपार्टमेंटची किंमत बाजारमूल्यानुसार प्रति चौरस फूट सुमारे ४० हजार रुपये इतकी आहे. दोन एकरांवर पसरलेला हा प्रोजेक्ट टायर-२ बिल्डर, क्रिस्टल ग्रुपचा आहे. हा निर्माणाधीन प्रकल्प असून त्यात एकूण ३४ अपार्टमेंट्स आहेत. मुद्रांक शुल्काच्या कपातीचा फायदा घेण्यासाठी आताच नोंदणी केली असावी.'

सनी लिओनीने एमटीव्ही इंडियावरील एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्समधून पदार्पण केलं. 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला होता. तर 'स्प्लिट्सविला' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन तिने केलं. याशिवाय ती 'जॅकपॉट', 'रागिनी एमएमएस' आणि मल्याळम चित्रपट 'मधुरा राजा'मध्ये झळकली. 

हेही वाचा : बॉलिवूडला मोठा फटका; अक्षयच्या 'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा ढकललं पुढे

महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०२१ मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरनेही मुंबईतील जुहू परिसरात तब्बल ३९ कोटी रुपयांचं घर विकत घेतलं. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आलिया भट्टने वांद्रे परिसरातील इमारतीत ३२ कोटी रुपयांचं घर विकत घेतलं. हे २,४६० चौरस फुटांचं घर आहे. 
 

loading image